एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना गुवाहाटीतून आवाहन; महाविकास आघाडीला म्हणाले ‘अजगर’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो प्रयोग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं. या सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं बंडही चर्चेत आहे. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं होतं. ते खरं ठरवत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी हे बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही आक्रमक झाले आहेत. तसंच आदित्य ठाकरे, संजय राऊत या सगळ्यांकडूनही एकनाथ शिंदे यांच्यावर आणि निघून गेलेल्या बंडखोरांवर टीका करणं सुरू आहे. या टीकेला ट्विटच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे?

हे वाचलं का?

प्रिय शिवसैनिकांनो, म.वि.आचा खेळ ओळखा. मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना आणि शिवसैनिकांना सोडवण्यासाठी मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित

आपला

ADVERTISEMENT

एकनाथ संभाजी शिंदे

ADVERTISEMENT

हे ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी आता शिवसैनिकांनाच आवाहन केलं आहे. महाविकास आघाडीलाच विरोध दर्शवत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष शिवसेनेचं नुकसान करत आहेत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तसंच शिवसेनेने हे म्हणणं खोडून काढलं आहे.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या राजकारणात झडत असताना आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत शिवसैनिकांना हा लढा समर्पित असल्याचं आणि ही लढाई तुमचीच असल्याचं म्हटलं आहे. तसंच म.वि.आ. हा अजगर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अजगर ज्याप्रमाणे शिकार गिळंकृत करून सुस्तपणे पडून राहतो तसाच अर्थ या ठिकाणी एकनाथ शिंदेंना अभिप्रेत आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. त्यांच्याजवळ शिवसेनेच्या ३६ पेक्षा जास्त तसंच अपक्ष मिळून ४६ हून जास्त आमदारांचं बळ आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत गेलं पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच या सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे यांनाच आपले नेते म्हणून निवडलं आहे. महाराष्ट्रात सत्तानाट्य संपेल असं चित्र आहे. पुढच्या आठवड्यात काय काय घडामोडी घडणार? हे सगळं पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे नंबर्स नाहीत हे दिसतंय. पुढे पुढे काय घडतं ते पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT