Shiv Sena विषयीच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत BJP आमदार प्रसाद लाड यांची पलटी, मीडियावर फोडलं खापर
मुंबई: भाजपच्या (BJP) माहीम (Mahim) येथील कार्यालयात उद्घाटन करताना आमदार प्रसाद लाड (MLC Prasad Lad) यांनी असं म्हटलं होतं की, ‘वेळ पडली तर शिवसेना भवनही (Shivsena Bhavan) फोडू’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला काही तास उलटत नाही तोच प्रसाद लाड यांनी त्याचं संपूर्ण खापर हे मीडियावर फोडलं आहे. आपण असं म्हटलोच […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपच्या (BJP) माहीम (Mahim) येथील कार्यालयात उद्घाटन करताना आमदार प्रसाद लाड (MLC Prasad Lad) यांनी असं म्हटलं होतं की, ‘वेळ पडली तर शिवसेना भवनही (Shivsena Bhavan) फोडू’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला काही तास उलटत नाही तोच प्रसाद लाड यांनी त्याचं संपूर्ण खापर हे मीडियावर फोडलं आहे. आपण असं म्हटलोच नव्हतो. माध्यमांनीच माझ्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास केला आहे. असं आता प्रसाद लाड म्हणत आहेत.
प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक शिवसैनिक देखील आक्रमक झाले होते. शिवसेना नेते सचिन अहिर यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत प्रसाद लाड यांना आव्हान दिलं होतं की, ‘शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. शिवसेना भवनाच्या फुटपाथवर येऊन दाखवावं त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.’ असं सचिन अहिर म्हणाले होते.
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागताच प्रसाद लाड यांनी याप्रकरणाचं खापर मीडियावर फोडंल. मात्र, यावेळी त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.
प्रसाद लाड यांनी दिलं स्पष्टीकरण, मीडियावर फोडलं खापर









