Nagpur हत्याकांडाचं गूढ उलगडलं, मेव्हणीसोबत अनैतिक संबंध; एकाच वेळी दोन कुटुंबांची राखरांगोळी
योगेश पांडे नागपूर: नागपूरच्या (Nagpur) पाचपावली परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नी (Wife)आणि मुलांसह सासरच्या मंडळींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (22 जून) उघडकीस आली होती. ही संपूर्ण घटना मेव्हणीसोबतच्या (Sister-in-law) अनैतिक संबंधातून (immoral relationship)घडली असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. ही माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. मेव्हणीसोबत असलेल्या […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे
नागपूर: नागपूरच्या (Nagpur) पाचपावली परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नी (Wife)आणि मुलांसह सासरच्या मंडळींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (22 जून) उघडकीस आली होती. ही संपूर्ण घटना मेव्हणीसोबतच्या (Sister-in-law) अनैतिक संबंधातून (immoral relationship)घडली असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. ही माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
मेव्हणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एकाच वेळी दोन कुटुंबाची राखरांगोळी झाल्याचं आता समोर आलं आहे. आरोपी अलोक मातूरकर याने आपली पत्नी विजया, मुलगा साहिल आणि मुलगी परी, सासुबाई लक्ष्मीबाई आणि मेहुणी – अतिशा यांची आधी हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
हत्याकांड का घडलं?
अलोक राहत असलेल्या ठिकाणापासून त्याची सासूरवाडी अगदीच जवळ होती. इथेच आलोकची मेव्हणी अतिशा आणि त्याचे सासू-सासरे राहत होते. दरम्यान, अलोक आणि त्याची मेव्हणी अतिशा यांच्यात अनैतिक संबंध होते. यावरूनच अलोक आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये अनेकदा वाद होत होते.
दोन महिन्यापूर्वीच अलोकची मेव्हणी अतिशा हिने अलोकविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता.
दरम्यान, घटनेच्या दिवशीसुद्धा अलोकने त्याच्या मेव्हणीवर जबरदस्ती करून नंतर तिची हत्या केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
सामूहिक हत्याकांडाने नागपूर हादरलं, पतीकडून पत्नी आणि मुलांसह सासरच्या मंडळीची हत्या
काही मिनिटातच संपूर्ण कुटुंबाची राख…
जेव्हा अलोकने मेव्हणी अतिशाची हत्या केली तेव्हाच त्याची सासू देखील समोर आली. त्यामुळे अलोकने तिची देखील निर्घृण हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने आपल्या घरी जाऊन आपली दोन मुलं ( 11 आणि 14 वर्ष वय) आणि पत्नीची सुद्धा धारदार शस्त्रानं हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
या संपूर्ण घटनेमध्ये अलोकचे सासरे देविदास बोबडे हे मात्र सुदैवाने वाचले. कारण ते सुरक्षा गार्डची नोकरी करतात आणि जेव्हा घटना घडली तेव्हा ते कामावर होते. त्यामुळेच ते बचावले.
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह; मुलीच्या जबाबामुळे उघडकीस आला गुन्हा
ऑनलाइन पोर्टलवरुन मागवलेला चाकूचा सेट
अलोकने काही दिवसांपूर्वीच चाकूचा एक सेट घरगुती वापरासाठी म्हणून ऑनलाईन मागवला होता. त्याच चाकूच्या सेटमधील एका चाकूने त्याने हे हत्याकांड घडवून आणले असल्याचे आता समोर आले आहे.
हत्याकांडाचा घटनाक्रम
-
काही दिवसांपासून अलोक आणि त्याच्या मेव्हणीमध्ये वाद वाढले होते.
-
रविवारी रात्री अलोक आणि त्याच्या मेव्हणीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर अलोकने तिच्यावर जबरदस्ती केला आणि तिची हत्या केली. याचवेळी सासू देखील समोर आल्याने त्याने सासूची देखील हत्या केली.
-
रविवारी रात्री उशिरा तो आपल्या घरी परतला आणि त्याने आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची देखील हत्या केली आणि नंतर स्वतः गळफास घेतला.
-
सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अलोकच्या घराचं दार बंद होतं. त्यामुळे त्याच्या शेजाऱ्यांचा काही तरी घडलं असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी दार ठोठावून पाहिलं. मात्र, त्यांना आतून काहीही प्रत्युत्तर मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.
-
सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर ही भयानक घटना समोर आली.
-
दरम्यान, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Double Murder : आई आणि मुलाची पुण्यात हत्या, पती बेपत्ता असल्याने गूढ वाढलं
हत्याकांडातील मृतांची नावं:
-
विजया मातूरकर – पत्नी
-
साहिल मातूरकर – मुलगा
-
परी मातूरकर – मुलगी
-
अतिशा बोबडे – मेव्हणी
-
लक्ष्मी बोबडे – सासू
-
अलोक मातूरकर – (आरोपीने 5 जणांच्या हत्येनंतर गळफास घेऊन केली आत्महत्या)