MLC Election : नागपूरमध्ये भाजपला घोडेबाजाराची धास्ती; नगरसेवक पाठवले गोव्याला
–योगेश पांडे, नागपूर राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागी बिनविरोध निवडणूक होणार असली, तरी नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत होण्याची चिन्हं दिसत आहे. भाजपच्याच नगरसेवकाला पक्षात घेत काँग्रेसने उमेदवारी दिल्यानं भाजप सावध झाली आहे. नगरसेवकांचा घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपने नगरसेवकांना गोव्याला हलवलं आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीकडे सगळ्याचंच […]
ADVERTISEMENT

–योगेश पांडे, नागपूर
राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागी बिनविरोध निवडणूक होणार असली, तरी नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत होण्याची चिन्हं दिसत आहे. भाजपच्याच नगरसेवकाला पक्षात घेत काँग्रेसने उमेदवारी दिल्यानं भाजप सावध झाली आहे. नगरसेवकांचा घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपने नगरसेवकांना गोव्याला हलवलं आहे.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीकडे सगळ्याचंच लक्ष लागलेलं आहे. भाजपकडून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून पक्षात आलेल्या डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना मैदानात उतरवलं आहे.
या राजकीय समीकरणामुळे भाजपला नगरसेवकांचा घोडेबाजारा होण्याची भीती आहे. निवडणुकीमध्ये नगरसेवकांचा घोडेबाजार होऊन मतं फुटू नये, यासाठी भाजपनं पक्षाच्या नगरसेवकांना मतदानापर्यंत बाहेर पाठवलं आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपने नगरसेवकांना गोव्याला रवाना केलं आहे. नागपूर विमानतळावरून हे नगरसेवक रात्री गोव्याला रवाना झाले.