धक्कादायक! नरबळीसाठी चेन्नईवरुन चार वर्षाच्या मुलाचं अपहरण, दोन आरोपी अटकेत; बालकाची सुटका
नरबळीसाठी चेन्नईवरुन एका चार वर्षांच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रुमला तामिळनाडू एक्स्प्रेस मध्ये दोन आरोपी चेन्नईतून एका बालकाचं अपहरण करत जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन नागपूर रेल्वे पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता दोन व्यक्तींकडे लहान मुल दिसून आलं. चौकशीदरम्यान या दोन्ही व्यक्तींनी योग्य […]
ADVERTISEMENT
नरबळीसाठी चेन्नईवरुन एका चार वर्षांच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रुमला तामिळनाडू एक्स्प्रेस मध्ये दोन आरोपी चेन्नईतून एका बालकाचं अपहरण करत जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन नागपूर रेल्वे पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता दोन व्यक्तींकडे लहान मुल दिसून आलं.
ADVERTISEMENT
चौकशीदरम्यान या दोन्ही व्यक्तींनी योग्य उत्तरं न दिल्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी आपला हिसका दाखवल्यानंतर दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
मोनू केवट आणि शिब्बु केवट अशी या आरोपींची नावं असून त्यांनी चेन्नईतून या बालकाचं अपहरण केल्याची कबुली देत नरबळीसाठी याचा वापर करणार असल्याचं पोलिसांना सांगितलं. आरोपीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. परंतू पत्नीला मुलं-बाळ होत नसल्यामुळे एका तांत्रिकाने त्याला नरबळीचा सल्ला दिला होता. यानंतर दोघांनीही चेन्नईवरुन या बालकाचं अपहरण केलं.
हे वाचलं का?
दरम्यान नागपूर पोलिसांनी या लहान बालकाला शेल्टर होममध्ये ठेवून त्याच्या परिवाराशी संपर्क केला. तामिळनाडू पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. तामिळनाडू पोलिसांचं पथक नागपूरला दाखल झाल्यानंतर त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून बालकालाही त्याच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
वाढती गुन्हेगारी ठरतेय चिंतेचा विषय, NCRB च्या रेकॉर्डनुसार नागपूर गुन्हेगारीत अव्वल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT