वाढती गुन्हेगारी ठरतेय चिंतेचा विषय, NCRB च्या रेकॉर्डनुसार नागपूर गुन्हेगारीत अव्वल
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून होणारे गंभीर गुन्हे पोलीस यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. यामुळेच दुर्दैवाने नागपूरला राज्यातलं क्राईम कॅपिटल म्हणून ओळख मिळते आहे. ३७ लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नागपूर शहराने वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरने हे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे या […]
ADVERTISEMENT

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून होणारे गंभीर गुन्हे पोलीस यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. यामुळेच दुर्दैवाने नागपूरला राज्यातलं क्राईम कॅपिटल म्हणून ओळख मिळते आहे. ३७ लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नागपूर शहराने वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरने हे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकतं नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळी सुरू केली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ( NCRB) आकडेवारी नागपूरमधल्या गुन्हेगारीचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. नागपूर शहरात वर्षाकाठी सरासरी शंभर खुनाच्या घटना घडतात. महत्वाची गोष्ट म्हणजे ही संख्या पाटणा,लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांपेक्षा अधिक आहे. राज्यातील पुणे हे शहर या यादीत दहाव्या स्थानावर तर मुंबई सोळाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता नागपूर शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे या प्रश्नाचे उत्तर नागपूर पोलीस यंत्रणांना द्यावं लागणार आहे.
या संदर्भात शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे वेगळेच तर्क आहेत. त्यांच्या मते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो कडे नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाख असल्याची नोंद आहे,मात्र नागपूर शहराचा विस्तार झाला आहे. ग्रामीण नागपूरचे अनेक भागांचा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत समावेश झालेला आहे,त्यामुळे दर एक लाख लोक संख्येमागे हत्या प्रकरणात नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर दाखवत असले तरी पोलीस आयुक्तालयाचा झालेल्या विस्तराचा या मध्ये विचार करण्यात आलेला नसल्याचं ते म्हणाले आहेत.
नागपुरात हत्येच्या घटनांचा दर ३.९ टक्के:-