Nagpur ZP Election Result : नागपूरमध्ये फडणवीस-गडकरींना धक्का; काँग्रेसनं मारली बाजी
योगेश पांडे, नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवाराचा पराभव केल्यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी आणि 31 पंचायत समितीच्या जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडले. नागपूर जिल्ह्यात एकूण 60 टक्के मतदान झाले. याच निवडणुकीचा निकाल आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात येत आहे. नागपूर जिल्हा […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, नागपूर
विधान परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवाराचा पराभव केल्यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी आणि 31 पंचायत समितीच्या जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडले. नागपूर जिल्ह्यात एकूण 60 टक्के मतदान झाले. याच निवडणुकीचा निकाल आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात येत आहे.
नागपूर जिल्हा परिषद: सध्या हाती आलेल्या निकालानुसार 16 जिल्हा परिषद जागांपैकी 9 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत जिल्हा परिषद काबीज केली आहे. इथे भाजपला फक्त 2 जागी विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांवर विजय मिळाला आहे.
नागपूर: जिल्हा परिषद अंतिम निकाल (एकूण जागा 16)