Nalasopara: ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला मायलेकीने मजनूला दिला चोप
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. सगळीकडे गुलाबी गुलाबी वातावरण. सगळीकडे प्रेमाचा उत्सव होत असताना रोडरोमिओंनाही स्फुरण चढतं. अशाच एका रोडरोमिओला मायलेकीने चांगलाच चोप दिला. नालासोपाऱ्यात फिल्मीस्टाईल छेड काढणाऱ्या मजनूला तरुणी आणि तिच्या आईने धू धू धुतला. ही घटना घडलीये नालासोपाऱ्यातील डॉन लेन परिसरात. जानेवारी संपला की, प्रेमाचे वारे वाहू लागतात, कारण तरुण-तरूणाईला वेध लागतात ते […]
ADVERTISEMENT
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. सगळीकडे गुलाबी गुलाबी वातावरण. सगळीकडे प्रेमाचा उत्सव होत असताना रोडरोमिओंनाही स्फुरण चढतं. अशाच एका रोडरोमिओला मायलेकीने चांगलाच चोप दिला. नालासोपाऱ्यात फिल्मीस्टाईल छेड काढणाऱ्या मजनूला तरुणी आणि तिच्या आईने धू धू धुतला. ही घटना घडलीये नालासोपाऱ्यातील डॉन लेन परिसरात.
ADVERTISEMENT
जानेवारी संपला की, प्रेमाचे वारे वाहू लागतात, कारण तरुण-तरूणाईला वेध लागतात ते 14 फेब्रवारीचे म्हणजे व्हॅलेंटाइन डे (Valentine Day 2023)चे. सगळी हा दिवस साजरा केला जात असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी पोरींची छेड काढणाऱ्या रोमियोंच्याही घटना समोर आल्या. अशीच एक घटना घडली ती नालासोपाऱ्यात. व्हॅलेंटाइन डेला टाईमपासचा दगडू बनू पाहणाऱ्या एका रोमियोला मुलीने आणि तिच्या आईने चांगले धुतले.
नालासोपाऱ्यात मुलीची छेड काढणाऱ्या एका तरूणाला बेदम चोप देण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
हे वाचलं का?
Vasai : भयंकर… वाहतूक पोलिसाला नेलं फरफटत
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड, डॉन लेन परिसरात टवाळक्या करणाऱ्या एका रोडरोमियोने तरूणीची छेड काढली. त्यानंतर या रोडरोमियोला तरुणींनी धरलं. तरुणी व तिच्या आईने जाब विचारत त्याला रस्त्यावरच बसवलं. प्रश्नांचा भडीमार आणि फटके देत त्यांनी त्याला सतावून सोडलं. भर रस्त्यात रोडरोमियोला तरुणी व तिच्या आईने चांगलाच चोप दिला.
ADVERTISEMENT
सोमवारी सव्वाचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. तरुणी व तिच्या आईने या रोडरोमियोला अक्षरशः लाथा बुक्क्यांचा मार दिला. हा सगळा प्रकार पाहून बघ्याचीही मोठी गर्दी घटनास्थळी झाली.
ADVERTISEMENT
रोडरोमियोला तरुणी व तिच्या आईने देतानाचा हा व्हिडिओ तेथेच असलेल्या काही जणांनी काढला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माय-लेकीने रोडरोमियोला घडवलेल्या या अद्दलीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेला आला आहे.
भाईंदरच्या खाडीत श्रद्धाचा मोबाईल-क्रेडीट कार्ड, आफताबने सांगितली 4 महिन्यांची सगळी कहाणी
या परिसरात मुलींची छेड करण्याचे प्रकार वारंवार समोर येत असून रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणतीही नोंद झाली नाही. तसेच पीडित मुलगी आणि तरुण कोणत्या परिसरातील राहणारे आहेत याची मात्र खात्री झाली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT