Narayan Rane यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात, कोकणात काय घडणार?
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून (27 ऑगस्ट) पुन्हा सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यामुळे झालेली अटक यामुळे राणेंची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. मात्र आता जामीनवर बाहेर असल्याने राणे पुन्हा एकदा ही यात्रा सुरु करणार आहेत. या यात्रेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आणि राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून (27 ऑगस्ट) पुन्हा सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यामुळे झालेली अटक यामुळे राणेंची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. मात्र आता जामीनवर बाहेर असल्याने राणे पुन्हा एकदा ही यात्रा सुरु करणार आहेत. या यात्रेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आणि राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे.
दरम्यान, असं असलं तरीही स्थानिक प्रशासनाने सध्या सिंधुदुर्गात संचारबंदी लागू केली असल्याचं समजतं आहे. अशा परिस्थितीत राणेंकडून जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन नेमकं कशा पद्धतीने केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या दुसऱ्याच दिवशी अवघ्या महाराष्ट्रात राणेंविरोधात शिवसेनेने रान पेटवलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल सहा तासांनी त्यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. ज्यानंतर राणे हे मुंबईकडे रवाना झाले होते.
यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला होता. याचवेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की, आपण आपली जन आशीर्वाद यात्रा ही 27 ऑगस्टपासून सुरु करणार आहे.










