सुशांतसिंग आणि दिशा सालियनची हत्याच, तर ‘मातोश्री’वरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार’, राणेंचं खळबळजनक ट्विट
मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर सातत्याने झडत आहेतच. पण आता या आरोपांची धार अधिकच वाढत चालली असून वैयक्तिक देखील होऊ लागले आहेत. यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री यांनी आज (18 फेब्रुवारी) राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं एक ट्विट केलं आहे. […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर सातत्याने झडत आहेतच. पण आता या आरोपांची धार अधिकच वाढत चालली असून वैयक्तिक देखील होऊ लागले आहेत. यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री यांनी आज (18 फेब्रुवारी) राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं एक ट्विट केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर पुन्हा गंभीर आरोप केले होते. तर राणेंच्या याच आरोपाला उत्तर देण्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेतली होती. या सगळ्यानंतर आज नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यातील काही बांधकामाबाबत त्यांना मुंबई महापालिकेकडून एक नोटीस बजावण्यात आली. हीच नोटीस मिळाल्यानंतर आता नारायण राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, ‘मातोश्री’च्या चौघांसाठी ईडीची नोटीस तयार आहे.’
पाहा नारायण राणेंनी काय ट्विट केलंय:
‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.