महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार आता कायम आहे. कारण ते सध्या वादात आहेत. नवी मुंबईतल्या नेरूळ पोलीस ठाण्यात पीडित महिलेने जिवे मारण्याची धमकीची तक्रार दिली आहे. तर बेलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचीही तक्रार दिली आहे. गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटक होणार? भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार आता कायम आहे. कारण ते सध्या वादात आहेत. नवी मुंबईतल्या नेरूळ पोलीस ठाण्यात पीडित महिलेने जिवे मारण्याची धमकीची तक्रार दिली आहे. तर बेलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचीही तक्रार दिली आहे.
गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटक होणार?
भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांना या प्रकरणात कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. तसंच त्यांना अंतरिम जामीन मिळणार की नाही याचा फैसला २७ तारखेला होणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.