देवेंद्र फडणवीसांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने शहर कसं ओलीस ठेवलं, उद्या सांगणार -नवाब मलिक
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. समीर वानखेडेंची बदली आणि महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणाशी देवेंद्र फडणवीसांचा संबंध असल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. त्यामुळे मलिक विरुद्ध वानखेडे हा आरोप प्रत्यारोपाचा संघर्ष आता फडणवीस विरुद्ध मलिक असा बनला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असल्याचा दावा […]
ADVERTISEMENT
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. समीर वानखेडेंची बदली आणि महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणाशी देवेंद्र फडणवीसांचा संबंध असल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. त्यामुळे मलिक विरुद्ध वानखेडे हा आरोप प्रत्यारोपाचा संघर्ष आता फडणवीस विरुद्ध मलिक असा बनला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असल्याचा दावा केला होता. त्याला उत्तर देताना मलिकांनी मोठं विधान केलं.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी संपूर्ण शहराला अंडरवर्ल्डच्या मदतीने ओलीस ठेवल्याचं विधान केलं.
मलिक म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की, दिवाळीनंतर फटाके फोडणार. आम्हाला वाटतं फटाके भिजले आणि त्यामुळे जोरात वाजले नाहीत. नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत, असं वातावरण एक प्रकारे तयार केलं गेलं. देवेंद्रजी, 1999 मध्ये आमदार म्हणून आपण कदाचित पहिल्यांदाच या शहरात आला असाल. पण, आपल्या आधीही गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदसोबत लोकांची नावं जोडली होती. आम्ही मंत्री असतानाही मुंडे यांची भाषणं विधानसभेत व्हायची’, असं मलिक म्हणाले.
हे वाचलं का?
मलिक विरुद्ध फडणवीस : ‘त्यांचं एकच लक्ष्य आहे’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर ‘ट्वीट’ हल्ला
’62 वर्षांच्या आयुष्यात आणि 26 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतानाच्या काळात माझ्यावर अशा प्रकारचे आरोप कुणीही केले नाही. आज एका भुखंडावरून काही कागदपत्रं आपण (देवेंद्र फडणवीस) लोकांसमोर ठेवले. दीड लाख फूट जमीन मी माफियांच्या मध्यस्तीने कवडीमोल दराने घेतल्याचं म्हटलं गेलं आहे. मला वाटतं तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) माहिती देणारे तुमचे खबरे ‘कच्चे खिलाडी’ आहेत. तुम्ही म्हणाला असता, तर मीच तुम्हाला कागदपत्रं दिली असती आणि जास्तीची कागदपत्रं दिली असती.’
ADVERTISEMENT
‘आपण अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे. आज सगळ्या गोष्टी मी बोलणार नाही. पण, उद्या सकाळी दहा वाजता देवेंद्रजींचा आणि अंडरवर्ल्डचा महाराष्ट्रात काय खेळ आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या मदतीने संपूर्ण शहर कशाप्रकारे ओलीस (hostage) ठेवलं होतं, याची माहिती उद्या सकाळी देणार’, असं म्हणत मलिकांनी प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT