Nawazuddin Siddiqui अडचणीत; व्हीडिओ शेअर करत पत्नीचे गंभीर आरोप
Bollywood actor Nawazuddin Siddiqui : मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर (Nawazuddin Siddiqui) त्याची पूर्वीची पत्नी आलिया सिद्दीकीने (Alia Siddiqui) अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर नवाजुद्दीनविरोधात आलियाने बलात्काराची तक्रारही दाखल केली आहे. इस्टाग्रामवरुन व्हीडिओ शेअर करुन तिने हे आरोप केले आहेत. यात आलिया सिद्दीकी रडत असून नवाजुद्दीन सिद्दीकी तिची मुले तिच्यापासून हिसकावून […]
ADVERTISEMENT
Bollywood actor Nawazuddin Siddiqui :
ADVERTISEMENT
मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर (Nawazuddin Siddiqui) त्याची पूर्वीची पत्नी आलिया सिद्दीकीने (Alia Siddiqui) अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर नवाजुद्दीनविरोधात आलियाने बलात्काराची तक्रारही दाखल केली आहे. इस्टाग्रामवरुन व्हीडिओ शेअर करुन तिने हे आरोप केले आहेत. यात आलिया सिद्दीकी रडत असून नवाजुद्दीन सिद्दीकी तिची मुले तिच्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ती करत आहे. (Bollywood actor Nawazuddin Siddiqui has been filed a rape complaint by his ex-wife Alia Siddiqui.)
व्हिडिओ शेअर करत आलिया म्हणाली की, ‘एक महान अभिनेता जो कायम महान माणूस बनण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या निष्पाप मुलांना जेव्हा त्याची निर्दयी आई अनैतिक म्हणत असते तेव्हा हा घाणेरडा माणूस केवळ शांत उभा असतो. कालच त्याच्याविरुद्ध मी वर्सोवा पोलीस ठाण्यात पुराव्यासह बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. काहीही झाले तरी मी माझ्या निष्पाप मुलांना त्या निर्दयी हातात जाऊ देणार नाही.
हे वाचलं का?
Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीनवर बायकोने केले गंभीर आरोप!
इंस्टाग्रामवर केलेल्या व्हीडिओमध्ये आलिया म्हणते, ‘नवाजने काल कोर्टात केस दाखल केली आहे, यात त्याने मुलांचा ताबा मागितला आहे. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की, ज्या व्यक्तीला मुले कधीच जाणवली नाहीत, ना पोटात ना त्यानंतर कधी. ज्याला बाळाच्या डायपरची किंमत किती आहे हेही माहित नाही. डायपर कसे घालायचे हे माहित नाही. मुलं केव्हा मोठी झाली कळलं नाही. ज्याला काहीच माहित नाही तो व्यक्ती मुलांना माझ्यापासून हिसकावून आपल्या ताकदीवर दाखवू इच्छितो की तो खूप चांगला बाप आहे.
ADVERTISEMENT
मुलांबद्दल बोलत असताना, आलिया रडायला लागते आणि म्हणते की ‘नवाज त्याच्या ताकदीचा चुकीचा वापर करत आहे. ते पैशाने काहीही विकत घेऊ शकतात, पण माझी मुले माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाहीत. नवाजुद्दीन आणि आलियाच्या नात्याबद्दल आलिया म्हणते, ‘तुम्ही मला तुमची पत्नी मानत नाही, पण मी तुम्हाला नेहमीच माझा नवरा मानत होतो. ही गोष्ट मी कदापि सहन करणार नाही. मला सध्या एका एका रुपयाची अडचण आहे. आता तुम्ही माझी मुले माझ्याकडून हिसकावून घेत आहात. आलिया पुढे म्हणाली की, मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की निर्णय तिच्या बाजूने येईल.
ADVERTISEMENT
Shiv Sena: शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील
पत्नीसोबतच्या वादावर नवाजुद्दीनने नुकतेच मौन सोडले होते. एका मुलाखतीत या प्रकरणावर बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला होता की, ‘मला कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही बोलायचे नाही. फक्त माझ्या मुलांनी शाळेत जावे एवढीच माझी इच्छा आहे. या सगळ्यामुळे माझ्या मुलांच्या शालेय शिक्षणावर वाईट परिणाम झाला आहे. माझी मुलं दुबईत शिकतात आणि गेल्या एक महिन्यापासून ते इथे आहेत. फक्त माझ्या मुलांनी शाळेत जावं एवढीच विनंती मला करायची आहे.” मुलांबद्दल बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकीही भावूक झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT