समीर वानखेडेंच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका, सेवेतून बरखास्त करण्याची मागणी

विद्या

शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला दिलेल्या जामिनाची प्रत समोर आल्यानंतर एनसीबीला मोठा झटका बसला आहे. कारण आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित कोणताही कट रचत नव्हता. त्याच्या व्हॉट्स अॅप चॅटमधूनही काहीही समोर आलेलं नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडेंवरही आरोपांमागून आरोप होत आहेत. मुंबईतल्या सद्गुरू बारची मालकी समीर वानखेडे यांची आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला दिलेल्या जामिनाची प्रत समोर आल्यानंतर एनसीबीला मोठा झटका बसला आहे. कारण आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित कोणताही कट रचत नव्हता. त्याच्या व्हॉट्स अॅप चॅटमधूनही काहीही समोर आलेलं नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडेंवरही आरोपांमागून आरोप होत आहेत. मुंबईतल्या सद्गुरू बारची मालकी समीर वानखेडे यांची आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे आजच नवाब मलिक यांच्या मुलींनी समीर वानखेडेंची लग्न पत्रिका समोर आणली आहे. त्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख केल्याचं ट्विट या दोघींनी केलं आहे.

अशात आता समीर वानखेडे यांच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत समीर वानखेडेंना एनसीबीच्या विभागीय संचालक पदावरून बरखास्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी IRS मधे दाखल होऊनही आपल्या जातीचा आणि धर्माचा खुलासा केला नाही त्यामुळे समीर वानखेडेंना त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात यावं अशी मागणी करणारी ही याचिका आहे. समाजसेवक महादेव कांबळे आणि वकील नितीन सातपुते यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन?; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

हे वाचलं का?

    follow whatsapp