“१५ ऑगस्टला महिलांच्या सन्मानाबाबत बोलायचं आणि दोन दिवसांनी..” शरद पवारांची मोदींवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून दिल्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी महिला सन्मानाच्या करायच्या आणि दोन दिवसांनी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना सोडून द्यायचं हाच महिलांचा सन्मान आहे का? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून दिल्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी महिला सन्मानाच्या करायच्या आणि दोन दिवसांनी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना सोडून द्यायचं हाच महिलांचा सन्मान आहे का? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.
काय म्हटलं आहे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत?
“आपण सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं. महिलांबाबत ते खूप चांगलं बोलले. महिलांच्या सन्मानाबाबत त्यांनी त्यांच्या भाषणात मुद्दे मांडले. पण एकीकडे महिलांच्या सन्मानाबाबत बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. बिलकिस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सगळ्यांना माहित आहे.”
बलात्काऱ्यांना सोडून देणं हा महिलांचा सन्मान आहे का?
बिलकिस बानो प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा दिली. महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतर गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगली माणसं म्हणून सोडून देतं? हा महिलांचा सन्मान आहे का? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांचा सन्मान करण्याबाबत भाषण करतात. दुसरीकडे बलात्काऱ्यांना सोडून दिलं जातं. या सगळ्यातून सरकारला काय संदेश द्यायचा आहे? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला.
बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण काय?
“२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या बोग्या जाळण्यात आल्या. या गाडीतून अयोध्येतून कारसेवक परत आले होते. या दुर्घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या.