कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी यासंदर्भातली तक्रार दिली आहे. कंगना रणौतने एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत जे वक्तव्य केलं होतं ते वादग्रस्त होतं. त्यामुळेच कंगनाच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली होती. ज्यानंतर ही तक्रार देण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी यासंदर्भातली तक्रार दिली आहे. कंगना रणौतने एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत जे वक्तव्य केलं होतं ते वादग्रस्त होतं. त्यामुळेच कंगनाच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली होती. ज्यानंतर ही तक्रार देण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतही FIR दाखल
अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबईतही आपकडून FIR दाखल करण्यात आली आहे. कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्या सगळ्यांचा अपमान केला आहे असं म्हणत ही FIR करण्यात आली आहे.