नागालॅंडमध्ये पवारांचा चमत्कार; विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagaland assembly Election Result :

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कायमच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राष्ट्रवादीला थेट ईशान्येत मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप (BJP) युतीला इथून ३७ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर ३ नंबरवरील जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. त्यामुळे ६० जागांच्या विधानसभेत पवारांच्या पक्षाचा आता थेट विरोधी पक्षनेता होणार आहे. (NCP has won 7 seats in Nagaland Legislative Assembly. Second rank votes have been received in 5 seats)

देशात आज विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीचे वारे वाहत आहेत. नागालॅंड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या सर्व निवडणुकांसाठी २६ आणि २८ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. याच मतदानाची मतमोजणी आज पार पडली.

हे वाचलं का?

Ramdas Athawale यांचा ईशान्येत करिश्मा; नागालँडमध्ये RPI(A) दोन जागांवर विजयी

पाच वर्षांत पवारांनी काय जादू केली?

यापूर्वी २०१८ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. तर, भाजपने २० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना १२ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसने १८ जागांवर विजय मिळवला होता. पण यंदा काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.

ADVERTISEMENT

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहण्याची शक्यता :

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आता कायम राहण्याची शक्यता आहे. पवारांचे महाराष्ट्रातून ५२ आमदार आहेत. याशिवाय केरळमध्ये २, झारखंडमध्ये १ आणि नागालॅंडमध्ये ७ आमदार आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ४ खासदार आणि लक्षद्वीपमधून १ खासदार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पवारांनी सर्व नियमांची पुर्तता केल्यास २०२४ साली त्यांच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

MLC Election Results 2023 : ‘3 विरुद्ध 1’; विधान परिषद निकालात ‘मविआ’ची सरशी

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी,

  • लोकसभेच्या एकूण जागांच्या किमान २ टक्के जागा ३ राज्यांमधून. म्हणजेच लोकसभेत ३ राज्यांमधून किमान ११ खासदार गरजेचे असतात

  • लोकसभेत किमान ४ खासदार. सोबतच ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान ६ टक्के मत.

  • किमान ४ राज्यांमध्ये संबंधित पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT