उद्या राज्याच्या सत्तासंघर्षाची ‘सुप्रिम’ सुनावणी, छगन भुजबळांनी दिले मोठे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिक: राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं आहे परंतु या सरकारचा कायदेशीर पेच अजूनही कोर्टात आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात खरी लढाई आहे. शिंदे गटातील १६ आमदारांचं निलंबन असो किंवा शिवसेना कोणाची अशा प्रश्नांची उत्तरं उद्या मिळू शकतात कारण उद्या सुप्रिम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आहे. या कोर्टातील सुनावणीवरती आणि अनेक विषयांवरती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

सुप्रिम कोर्टातील सुनावणीवरती काय म्हणाले छगन भुजबळ?

”दोन्ही पक्षांना असे वाटते आहे की आमच्या बाजूनेच निकाल लागेल. परंतु आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. उद्या निर्णय लागतो की आणखी काही घटनात्मक बेंच बसतो हे पाहावं लागेल. मागेच वाटले होते की निर्णय लागेल पण तारीख पुढे गेली. घटनापीठ तयार करावे लागेल असे सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे.” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

गणेशोत्सव, नवरात्रात गर्दीचं श्रेय भाजपनं घेऊ नये- छगन भुजबळ

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदू सण साजरे झाले नाही असा भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला होता. त्याला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले ”कोरोना असल्याने सगळेच, तुम्ही सुद्धा घरी बसले होते. मोदी साहेबांनीच लॉकडाऊन सांगितल्याने आपण धार्मिक सण कसे साजरे करणार होतो?. कोरोना कमी झाल्याने आता धार्मिक स्थळांवर, सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होते आहे. गणेशोत्सव, नवरात्रात सुद्धा गर्दी होणार असल्याने हे श्रेय भाजपने घेता कामा नये. दोन वर्षांचीच आता भरपाई होत आहे” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

शिवभोजन केंद्रावर काय म्हणाले छगन भुजबळ?

”शिवभोजन केंद्रांचे पैसे अडकले आहेत याबाबत उद्या मी हाऊसमध्ये बोलेल आणि त्यांना सांगेल की ही गरीब मंडळी असून त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ते बंद पडतील. चांगली योजना असून सरकारने ती सुरू ठेवावी. सत्तांतरण झाले पण मंत्रिमंडळ विस्तार नव्हता, पालकामंत्री नाहीये आणि आता अधिवेशन सुरू झाले त्यामुळे कोणाकडे याबाबत बोलायचे हेच कळत नाहीये” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

नाशिक-मुंबई रस्त्याबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?

”नाशिक मुंबई प्रवासाला सहा तास लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे येऊन बघावं. खूप त्रास आहे खड्डयांचा अजून बुजवले जात नाहीत. महामार्गांची ही परिस्थिती आहे, शहरातही आहे. टोलवाल्यांनी बाउन्सर वगैरे ठेवून वाद घालू नये. पोलीस त्यांची व्यवस्थित खबरदारी घ्यायला समर्थ आहेत असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT