राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी देणारा आरोपी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना धमकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याला धमकावणारा व्यक्ती हा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा सलगर यांनी केला होता.

ADVERTISEMENT

गोपीचंद पडळकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी सोलापुरात हल्ला झाला होता. एका युवकाने पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकला होता. पोलिसांनी या आरोपीला नंतर अटक केली. यावेळी सलगर यांनी पडळकर म्हणजे धनगर समाज नसल्याची टीका केली होती. यानंतर तुझी इज्जत लुटतो अशी धमकी देणारा फोन सलगर यांना आला होता.

कोण आहेत सक्षणा सलगर?

हे वाचलं का?

  • सक्षणा सलगर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या

  • ADVERTISEMENT

  • उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या त्या सदस्याही आहेत.

  • ADVERTISEMENT

  • उत्तम वक्त्या म्हणून सक्षणा सलगर यांची ओळख

  • सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, घोंगडी बैठकीवरुन परतताना झाला हल्ला

    सक्षणा सलगर यांनी केलेल्या ट्वीटनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपण सक्षणा यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “सक्षणा, तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. पोलिसात लेखी तक्रार ही कर मी तुझ्या सोबत आहे. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दर्शवला होता.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT