शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना NCP आमदार चढले घोड्यावर, सोशल मीडियावर शिवप्रेमींमध्ये नाराजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वसमत शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदार नवघरे चक्क घोड्यावर चढले.

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर राजू नवघरेंचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. संभाजी ब्रिगेडनेही महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांवर आमदार नवघरेंचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तात्काळ माफी मागितली आहे. “महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही, कार्यकर्ते आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार घातला. फक्त व्हिडीओ व्हायरल करताना माझाच करण्यात आला. शिवसेनेचे माजी आमदार जयप्रकाश मुंदडाही वर चढले होते”, असं स्पष्टीकरण नवघरेंनी मीडियाशी बोलताना दिलं आहे.

हे वाचलं का?

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. पुतळा शहरात उभारावा मी भरपूर प्रयत्न केले. महाराजांचे जंगी स्वागत व्हावे म्हणून पोलिसांची परवानगी नसतांना आम्ही नोटिसा स्वीकारून महाराजांच्या स्वागतासाठी बँड लावला. पण माझ्या सारख्या सामान्य माणसाला राजकीय षड्यंत्रतून बदनाम केलं जातंय असंही नवघरे म्हणाले.

ADVERTISEMENT

पुतळ्यांवरुन महाराष्ट्रात राजकारण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. राजू नवघरेंचा व्हिडीओ-फोटो व्हायरल झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर स्पष्टीकरण देताना नवघरे यांनी संभाजी ब्रिगेड मला एकट्याला बदनाम करत असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

“मी अठरा पगड जातीला मानणारा कार्यकर्ता आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी येथे होतो, खासदार साहेब होते, माजी आमदार मुंदडा साहेब येथे होते, मला यांनी वर चढवलं, तुम्ही पहिल्यांदा हार घाला म्हणले. शिवसेनेचे माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा ही वर चढले, माझी चूक झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो, पण मला बदनाम करू नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात ही दाखल होणार नाही.” त्यामुळे नवघरेंच्या या स्पष्टीकरणानंतर आता या घटनेचे पुढे पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT