छत्रपतींवरील वादग्रस्त वक्तव्यांनंतर अमोल कोल्हे संतापले : नेमकं खुपतयं काय? भाजपला सवाल
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. अशातच काही दिवसांपासून सार्वजनिक व्यासपीठापासून दुर असलेले आणि भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा असलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल […]
ADVERTISEMENT
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे.
ADVERTISEMENT
अशातच काही दिवसांपासून सार्वजनिक व्यासपीठापासून दुर असलेले आणि भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा असलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांसमोर येत या वक्तव्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला नेमकं खुपतयं काय? असा सवाल विचारत त्यांनी भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे हे मराष्ट्रासमोर स्पष्ट स्पष्ट करावं, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता माननीय सुधांशुजी त्रिवेदी यांनी अत्यंत संतापजनक आणि उद्वेगजनक विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं काय खुपतयं काय तुम्हाला? म्हणजे कधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी महामहिम राज्यपाल बोलतात. वारंवार ही बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज का केली जातात? काय खुपतयं काय तुम्हाला?
हे वाचलं का?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं हा आदर्श घालून दिला. हा तुम्हाला खुपतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी हे वास्तव अधोरेखित केलं हे तुम्हाला खुपतयं? छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी कसं प्रेरीत केलं जाऊ शकतं हे उदाहरणं या मातीत घालून दिलं, हे तुम्हाला खुपतयं?
छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं राज्य, रयतेचं राज्य, आपलं स्वराज्य कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ घालून दिला हे तुम्हाला खुपतयं? नक्की खुपतयं काय तुम्हाला? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आङे. जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता असं विधान करतात, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं उदाहरण आणि कौतुक जगभरातले अनेक राज्यकर्ते करतात तो गनिमी कावा तुम्हाला समजू नये? जर समजलं नसेल तर वाटलं तर तुम्हाला काही पुस्तक पाठवतो किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या ‘शिवप्रताप गरुड झेप’ची लिंक पाठवतो. तेव्हा तुम्हाला कळेल की अखंड हिंदुस्थानातील भले भले महाराज हे माना खाली घालून औरंजेबाच्या दरबारात उभे राहत होते, तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून या हिंदुस्थानाच्या मातीला स्वाभिमान काय असते हे शिकवलं होतं आणि त्या महाराजांविषयी तुम्ही अशी वक्तव्य करता?
ADVERTISEMENT
इंडियन आर्मीची जेवढी बटालियन आहेत, त्या सर्वांची वॉर क्राय देवांच्या नावाने आहेत. पण फक्त मराठा बटालियनच वॉर क्राय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत, पण आमच्यासाठी ते देवापेक्षाही कमी नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा.छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते आहे आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशु त्रिवेदीजी, आपण आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे हे मराष्ट्रासमोर स्पष्ट स्पष्ट करावं आणि महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. जय शिवराय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT