बाळासाहेबांचं नाव चालतं मग मुलगा आणि नातू का चालत नाही? सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुप्रीम कोर्टाने आज शिंदे गटाला दिलासा देत शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय ठाकरे गटासाठी झटका मानला जातो आहे तर शिंदे गटासाठी दिलासा मानला जातो आहे. अशात ठाकरे विरूद्ध शिंदे या लढाईत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उडी घेतली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी?

उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे ही लढाई दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेब आणि माँ यांच्यासाठी सर्वस्व असलेला मुलगा (उद्धव ठाकरे) आणि नातू (आदित्य ठाकरे) का चालत नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. पारनेरमध्ये आज सुप्रिया सुळे या आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली. या बसच्या उद् घाटनाला सुप्रिया सुळे या अहमदनगरमध्ये होत्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांचं दिलं उदाहरण

शरद पवार यांची काँग्रेसने हकालपट्टी केली होती. त्यावेळी शरद पवारांनी पक्षावरच दावा सांगितला नाही. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. एका घरात राहून मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा. समविचारी पक्ष असतातच ना? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर ठाकरे कुटुंबावर आता आरोप करणार असाल तर ते चुकीचं आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे वाचलं का?

शरद पवार यांच्यावर कारवाई झाली त्यावेळी त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि उभे राहिले. काँग्रेस पक्ष माझाच आहे, त्यातले लोक माझेच आहेत असं म्हटलं नाही. सध्या जे काही राजकारण सुरू आहे ते पाहून बाळासाहेब ठाकरेंना खूप वेदना होत असतील असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं कुटुंब बघून मला आर आर पाटलांच्या कुटुंबाची आठवण येत असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी वेक्त केले. त्या पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली. त्याच्या उद्घाटनाला आल्या होत्या. यावेळेस त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची आणि त्यांच्या कुटुंबाची आठवण झाली असं सुळे म्हणाल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT