Supriya Sule : बाळासाहेब ठाकरे यांचा ‘सैनिक’ जे वागला ते दुर्दैवी
बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा होता. तो सैनिक आता गुवाहाटीच्या मातीत जाऊन काय करतोय काय माहित. जे घडतं आहे ते दुर्दैवी आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपूरला जाणाऱ्या वारीत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? […]
ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा होता. तो सैनिक आता गुवाहाटीच्या मातीत जाऊन काय करतोय काय माहित. जे घडतं आहे ते दुर्दैवी आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपूरला जाणाऱ्या वारीत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
”गुवाहाटीमध्ये ज्या पद्धतीने काय अडचण झाली आहे. तिथे पूर आला आहेत. तिथे आमचे आमदार आसामची सेवा करायला गेले असते तर मला आनंद झाला असता. मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून खूप फोटो पोस्ट केले जात आहेत. ते काही चांगलं नाही. घरातली चर्चा ही घरात होत असते. तुमच्या काही तक्रारी होत्या तर ते त्यांनी बोलायला हवं होतं. आसामला जाऊन व्यक्त होण्याची गरज नव्हती.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. s
माझ्या माहिती प्रमाणे मी एकनाथ शिंदे यांना भेटले तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या केबिनमध्येच भेटले. त्यांचा मुलगा श्रीकांत हा माझ्यासोबत खासदार आहे. तो खूप चांगला आहे, एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांशी माझे व्यक्तिगत पातळीवर खूप चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मुलासाठी असं पाऊल उचललं असंही लोक बोलत आहेत. त्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला या गॉसिपबाबत काहीही माहित नाही.
हे सगळे आमदार मतदार संघ सोडून गेले आहेत. त्यांना तिथे झोप कशी लागते आपला मतदारसंघ सोडून? इथे एवढे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करून हे आमदार तिथे फाईव्ह स्टार हॉटेलात गेले आहेत. जे घडतंय ते चांगलं नाही असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
हिंदुत्व जिवंत ठेवायचं आहे म्हणून आम्ही वेगळे झालो आहोत असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत त्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यासाठी आसामला जाऊन काय होणार आहे? बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहेत. दुसऱ्याच्या जिवावर उड्या मारणं सोपं असतं. जे काही करायचं असतं ते स्वतःच्या जिवावर करायचं असतं असंही सुप्रिया सुळे या एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हणाल्या.
महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आमदार आसाममधून काय घडतं आहे? गुवाहाटीत कशाला जाऊन बोलत आहात. सरळ इकडे या आणि बोला असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.