पार्थ पवार ‘वेलकम टु कोरेगाव’, शिवसेनेच्या आमदाराचं पवारांना आव्हान?
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात सध्या पार्थ पवार यांची चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स सुद्धा कोरेगाव तालुक्यात लावण्यात आले होते. यामुळे पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे […]
ADVERTISEMENT

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात सध्या पार्थ पवार यांची चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स सुद्धा कोरेगाव तालुक्यात लावण्यात आले होते. यामुळे पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या विषयी होत असलेल्या चर्चा या महत्वाच्या मानल्या जात आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे मतदारसंघ हातातून निसटला शिवसेनेचे नेते आमदार महेश शिंदे यांनी या ठिकाणी विजय मिळवत मतदारसंघ ताब्यात घेतला.