राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ पुन्हा वाढणार, ‘हा’ आमदार करणार NCP मध्ये प्रवेश
कुँवरचंद मंडले, नांदेड महाराष्ट्र (MAHARASHTRA) विधानसभा 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 54 आमदार निवडून आले होते. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी कोरोना संसर्गाने निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार संख्या […]
ADVERTISEMENT

कुँवरचंद मंडले, नांदेड
महाराष्ट्र (MAHARASHTRA) विधानसभा 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 54 आमदार निवडून आले होते. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी कोरोना संसर्गाने निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती.
ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार संख्या ही 53 झाली होती. मात्र, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागला असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: माध्यमांना दिली आहे.










