पाटणचा गडही राष्ट्रवादीने राखला, शंभूराज देसाई यांना पाटणकर पॅनलकडून धोबीपछाड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सत्यजीत पाटणकर यांचा पॅनलचा नगरपंचायतीत विजय झाला आहे. त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे. पाटणकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने 17-2 अशी एकहाती सत्ता राखली आहे. भाजप आणि काँग्रेसला या ठिकाणी शून्यही पार करता आलेला नाही. विधानसभेला पराभूत झाल्याने आता काय होणार अशी चर्चा होती. मात्र सत्यजीत पाटणकर यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पॅनलचा पराभव केला आहे.

ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीवर पुन्हा झेंडा फडकविला आहे. ५ प्रभागात झालेल्या राष्ट्रवादीअंतर्गत मैत्रीपुर्ण लढतीत विद्यामान नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेने मागील निवडणुकीत जिंकलेल्या दोन्ही जागा राखण्यात यश मिळविले असले तरी मंत्रीपद असतानाही त्यांना संख्याबळ वाढविण्यात अपयश आल्याचे निवडणुक निकालावरुन स्पष्ट होत आहे.

काँग्रेसने सहा जागेवर उमेदवार उभे केले होते मात्र त्यांना खातेही खोलता आले नाही. भाजपचे विद्यमान नगरसेवक सागर माने यांचा त्यांच्याच हक्काच्या प्रभागात नवख्या उमेदवाराकडुन पराभव पत्करावा लागला आहे. गटांतर्गत मोठा विरोध असणाऱ्या विद्यमान उपनगराध्यक्ष सचिन कुंभार यांनी विजय मिळविला असुन विद्यमान नगरसेविका संगिता देवकांत यांचे पुन्हा नगरपंचायतीत आगमन झाले आहे.

हे वाचलं का?

आधीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस १४, शिवसेना २ व भाजप १ असे बलाबल होते. त्यामध्ये शिवसेनेने आपल्या जागा राखल्या असल्यातरी शंभुराज देसाई यांच्या मंत्रीपदाचा नगरपंचायतीत कोणताही परिणाम झालेला नाही. त्याचवेळी भाजपला एकमेव जागा गमवावी लागल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ १५ झाले असुन जिल्ह्यातील नेत्यांसह पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचे मनोबल वाढविणारा हा निकाल असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १७ पैकी १५ जागा जिंकत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी सुज्ञ आणि स्वाभिमानी जनतेने खोट्या अश्वासनाला बळी न पडता राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा पाटण नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीकडे दिली अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT