Neet UG Result 2021 : नीट यूजीचा निकाल जाहीर, कसा बघाल रिझल्ट वाचा सविस्तर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पदवीस्तरावीरी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना Https://neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. NEET UG परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. आपला निकाल कधी लागतो याची प्रत्येकालाच प्रतीक्षा होती. आता हा निकाल जाहीर झाला आहे.

NEET 2021 निकाल कसा पाहायचा ?

स्टेप 1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्टेप 2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका.

ADVERTISEMENT

स्टेप 4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा.

ADVERTISEMENT

स्टेप 5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.

निकालात त्रुटी असल्यास कुठं संपर्क साधायचा?

गेल्या वर्षी, NEET कटऑफ स्कोअर सामान्य श्रेणीसाठी 720-147 होता जो 50 व्या पर्सेंटाइलच्या समकक्ष होता. एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी, NEET कटऑफ स्कोअर 146-113 च्या श्रेणीत होता, जो 40 व्या पर्सेंटाईलच्या समकक्ष होता. निकालात काही त्रुटी आढळल्यास, उमेदवार NTA शी ईमेल id- nta@neet.ac.in वर संपर्क साधू शकता.

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा NEET UG परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात आली. यापूर्वी कोव्हिड साथीच्या आजारामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर नीट यूजी (NEET UG)चे निकाल पाठवले आहे. अंडरग्रॅज्युएट मेडिकलच्या विद्यार्थी अनेक दिवसांपासून निकालाची वाट बघत होते. नीटचा निकाल त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://neet.nta.nic.in जाहीर करण्यात आला आहे.

NEET च्या निकालानंतर मेडिकल काउंसलिंग कमिटी (MCC)आणि काउंसलिंग बॉडी ऑल इंडिया कोटा आणि राज्य कोटा अंतर्गत मेडिकल प्रवेशासाठी सुरूवात होईल. या विषयी अधिक माहितीसाछी मेडिकल काउंसलिंग कमिटीच्या https://mcc.nic.in संकेतस्थळाला भेट द्यावी. एनटीएने ऑक्टोबर महिन्यात प्रिलिमिनरी अन्सर की (preliminary answer key) जारी केली. या द्वारे विद्यार्थ्यांना आपल्या गुणांचा अंदाज लावण्यास मदत होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT