कोंबडीचं पिल्लू खाल्लं, माथेफिरूने थेट गोळी झाडून केली मांजरीची हत्या
मनीष जोग, जळगाव आपल्या कोंबडीच्या पिल्लू मांजरीने खाऊन टाकलं या रागातून एका माथेफिरू व्यक्तीने थेट गोळी घालून मांजरीची हत्या केल्याची घटना जळगावात घडली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्दयी माथेफिरूने केलेल्या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. मिळालेल्या […]
ADVERTISEMENT

मनीष जोग, जळगाव
आपल्या कोंबडीच्या पिल्लू मांजरीने खाऊन टाकलं या रागातून एका माथेफिरू व्यक्तीने थेट गोळी घालून मांजरीची हत्या केल्याची घटना जळगावात घडली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्दयी माथेफिरूने केलेल्या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागात राहणारे पुष्कराज बानाईत हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. परिसरात असलेल्या भटक्या मांजरीचे ते संगोपन करतात. दरम्यान, बानाईत यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अनेक कोंबड्या पाळल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच बानाईत यांच्याकडील एका मांजरीने शेजारीच असलेल्या एक कोंबडीचं पिल्लू खाऊन टाकलं. या प्रकारने बानाईत यांचा शेजारी प्रचंड संतापला.