ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवशीच ‘कोमाराम भीम’चा नवा लूक रिलीज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

साऊथचा स्टार ज्युनिअर एनटीआरचा आज 38 वा वाढदिवस आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर ज्युनिअर एनटीआरने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकर ज्युनिअर एनटीआर आरआरआर या सिनेमामध्ये झळकणार आहे.

ADVERTISEMENT

‘आरआरआर’ हा सिनेमा एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला आहे. ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमातील त्याचा एक लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात एनटीआर ‘कोमारम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. एनटीआरने त्याचा हा लूक सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

लूकमध्ये एनटीआर हातात भाला दिसून येतोय. एनटीआरने हा लूक इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलंय, “तो मनाने बंडखोर आहे. हे साकारणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. मी तुमच्या सर्वांसमोर माझं सर्वात मोठं आव्हान सादर करणार आहे.”

हे वाचलं का?

ज्युनिअर एनटीआरचे हे पोस्टर चाहत्यांना फारचं आवडलं आहे. अनेकांनी याला भरभरून लाईक्स दिले आहेत. शिवाय काहींनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आरआऱआर या सिनेमात आलिया भट, अजय देवगण, राम चरण हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT