नवी मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ‘त्या’ हत्येचं गूढ उकललं; वादाचं मूळ गुजरातमध्ये!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Navi Mumbai Crime :

ADVERTISEMENT

नवी मुंबई : नेरूळ येथे चार दिवसांपूर्वी भरदिवसा बांधकाम व्यावसायिक सावजी पटेल (Savaji Patel Murder Case) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कारने जात असताना त्यांच्यावर भररस्त्यात गोळ्या झाडल्या होत्या. दिवसाढवळ्या आणि भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने नवी मुंबईत खळबळ उडाली होती. अशात आता या हत्येचं गूढ उकललं असून हत्येच्या वादाचं मूळ गुजरातमध्ये असल्याचं समोर आलं आहे. (New Mumbai builder Savaji Patel murder case)

गुजरातमधील गावात झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मुंबईत हत्या :

सावजी पटेल यांच्या हत्येसाठी तब्बल पंचवीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याची खबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यामागे गावाकडील झालेल्या वाद कारणीभूत असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे.

हे वाचलं का?

असा लावला छडा :

पोलिसांनी या हत्येचा तपास करण्यासाठी वेगवेगळी तपास पथकं तयार करुन गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता. प्राथमिक तपासाl पोलिसांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजची पहाणी करुन आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलचा शोध घेतला. यानंतर मेहेक जयरामभाई नारीया (२८) हा राजकोट, गुजरात येथे असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेवून त्यास चौकशी केल्यावर या हत्येचा उलगडा झाला.

ठाकरे-दरेकरांमध्ये विधानसभेबाहेर सहानुभूतीची युती! नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

संशयित आरोपी मेहेक जयरामभाई नारीया याने दिलेल्या माहितीनुसार, बचूभाई धना पटणी याचा मृत सावजी पटेल याने १९९८ साली गुजरातमधील मूळ गावी खून केला होता. त्यानंतर ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०१२ मध्ये सावजी पटेल याने मेहेक नारीया याच्या नातेवाईकांना मूळ गावी त्याच्या हस्तकाकरवी भरचौकात मारहाण केली होती. हाच राग मनात ठेवून नवी मुंबईत बिहारमधील मारेकऱ्यांना बोलवून या हत्येची सुपारी देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

‘त्या’ एका फोटोमुळे संजय राऊत अडचणीत, थेट पोलिसात गुन्हा दाखल

मृत सवजीभाई पटेल यांच्या दैनंदिनी हालचालींवर निगराणी ठेवून, एकटं गाठून त्यांच्या गोळ्या झाडल्या. दरम्यान, आता गोळ्या झाडणारे मारेकरु यांना बिहार राज्यात तपास पथकाने अटक केली असून या आरोपींना लवकर नवी मुंबई आणत आहोत, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे याशिवाय आणखी 3 आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असून त्यांचा शोध सुरू असल्याचही पोलिसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT