पालघरमध्ये नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या जळीत मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली असून पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरजकुमार मिथीलेश दुबे (वय 27) यांचे अपहरण झाले नव्हते, तर चेन्नई आणि पालघरमधल्या सीसीटीव्ही फुटेजमध्य़े सूरजकुमार दुबे मुक्तपणे फिरत असल्याचे पुरावे प्राप्त झाल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

ADVERTISEMENT

पोलिसांच्या माहितीनुसार सूरजकुमार दुबे यांच्यावर 25 लाखाचे कर्ज होते आणि त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. सूरजकुमार दुबे यांच्यावर ₹8.43 लाखाचे कर्ज होते. ₹5.75 लाख रुपये सूरजकुमार दुबे यांनी त्यांच्या सहकाऱ्याकडून घेतले होते, तर ₹8.5 लाख रुपये त्यांच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांकडून शेअर बाजारात गुंतवण्यासाठी घेतले होते. पण दुबे यांना शेअर बाजारात मोठे नुकसान झाले आणि य़ाची कल्पना सूरजकुमार दुबे यांच्या कुटुंबीयांना नव्हती.

पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करेपर्यंत असे मानले जात होते की सूरजकुमार दुबे यांचे चेन्नईमधून अपहरण करण्यात आले होते आणि त्यांना पालघर येथे आणण्यात आले. या प्रकरणी तीन अज्ञातांविरुध्द या प्रकरणात खुनाचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता.

हे वाचलं का?

पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे माहिती देताना म्हणतात की दुबे यांच्याकडे तिसरा मोबाईल फोन होता ज्याची माहिती दुबे यांच्या कुटुंबीयांना नव्हती. या मोबाईलचा वापर दुबे शेअर बाजाराच्या ट्रेडिंगसाठी करायचे. दुबे यांनी सुमारे 17 लाख रुपये अँजल ब्रोकिंग या एजन्सीमार्फत गुंतवले होते. दुबे यांचे दोन डीमॅट अकाऊंट होते त्यातल्या एका अकाऊंटमध्ये -₹76000 तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ₹37000 रुपये शिल्लक होते.

शिंदे अजून माहिती देताना सांगितले की, ‘ ही केस अपहरणाची नसून खंडणीची आहे तरी या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे आणि या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासण्यात येतील. तसेच जिथे मृतदेह सापडला तिथे पोलिसांची चेकपोस्ट आहे तशीच ही जागा अवघड ठिकाणी आहे जिथे माणसाला चढून जाणे अवघड आहे. या साऱ्या गोष्टींमुळे पोलीसांचा दुबे अपहरण प्रकरणात संशय बळावला.

ADVERTISEMENT

५ जानेवारी रोजी सूरजकुमार दुबे यांचा 90 टक्के जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पालघरमधील घोलवड जंगल परिसरात सापडला होता. दुबे यांनी त्यांचे चेन्नई विमानतळाच्या बाहेर अपहरण झाल्याचा दावा केला होता पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे काही आढळले नव्हते. सूरजकुमार दुबे यांनी चेन्नईपासून 60 किलोमीटर लांब असलेल्या वेल्लोर गावातल्या लॉजमध्ये मुक्काम केल्याची नोंद पोलिसांना सापडली आहे.

ADVERTISEMENT

त्यानंतर तलासरी नाक्यावर असलेल्या पेट्रोल पंपावरून एका व्यक्तीने दोन प्लास्टिक बाटल्यांमध्ये डिझेल घेतल्याचं सीसीटीव्ही प्राप्त झालं असून त्याची प्रतिमा मृत अधिकाऱ्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळे खंडणी व अपहरणाच्या दिशेने सुरु असलेला तपास आत्महत्याकडे वळल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT