Nikki Yadav: गोव्याचा प्लान, निक्कीसोबत कारमध्ये… स्टोरी ऐकून पोलिसही हादरले
Nikki Yadav Murder Case। Sahil Gehlot। Delhi Murder case । Delhi Crime News: श्रद्धा वालकर हत्येचं प्रकरण (Shraddha Walker Murder Case) ताजं असताना अशाच एका घटनेनं दिल्ली हादरली आहे. साहिल गेहलोतने (Sahil Gehlot) त्याच्याच लिव्ह इन पार्टनरची (Live In Partaner) क्रूर पद्धतीने हत्या केलीये. निक्की यादवसोबत (Nikki Yadav) सोबत जगण्यामरण्याच्या शपथा घेतल्यानंतर दोघांनी गोव्याला जाण्याचा […]
ADVERTISEMENT
Nikki Yadav Murder Case। Sahil Gehlot। Delhi Murder case । Delhi Crime News: श्रद्धा वालकर हत्येचं प्रकरण (Shraddha Walker Murder Case) ताजं असताना अशाच एका घटनेनं दिल्ली हादरली आहे. साहिल गेहलोतने (Sahil Gehlot) त्याच्याच लिव्ह इन पार्टनरची (Live In Partaner) क्रूर पद्धतीने हत्या केलीये. निक्की यादवसोबत (Nikki Yadav) सोबत जगण्यामरण्याच्या शपथा घेतल्यानंतर दोघांनी गोव्याला जाण्याचा प्लानही केला होता. पण, व्हॅलेंटाईनला चार दिवस बाकी असतानाच साहिल गेहलोतने निक्कीला संपवलं. कळस म्हणजे निक्कीला संपवून साहिलने दुसऱ्या तरुणीशी लग्नही केलं. (Sahil Gehlot kills girlfriend Nikki Yadav)
दिल्ली पोलिसांना एका बंद पडलेल्या ढाब्यातील फ्रीजमध्ये मृतदेह सापडला. हा मृतदेह निक्की यादव या तरुणीचा असल्याचं तपासातून समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला आणि साहिल गेहलोतला बेड्या पडल्या.
निक्की यादव हत्या : 2018 मध्ये बनले मित्र… 2023 मध्ये निक्कीचा घेतला जीव
निक्की यादव आणि साहिल गेहलोत 2018 मध्ये मित्र बनले. नंतर रिलेशनशिपमध्ये आले आणि फेब्रुवारी 2023 मध्ये साहिलन निक्की यादवची हत्या केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Crime : सकाळी प्रेयसीची हत्या, मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून दुसरीशी केलं लग्न
जानेवारी 2018 मध्ये साहिल गेहलोत दिल्लीतल्या उत्तमनगर मध्ये SSC परीक्षेची तयारी करण्यासाठी आला. त्याच वेळी हरयाणातील झज्जरमध्ये राहणारी निक्की यादवही डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी घेऊन दिल्लीत तयारीसाठी आली. दोघंही उत्तम नगरमधून एकाच बसने कोचिंगला जायचे. त्याच काळात दोघांची मैत्री झाली. पुढे दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं.
ADVERTISEMENT
पुढे साहिल गेहलोतने ग्रेटर नोएडातील एका कॉलेजमध्ये डी.फार्म अभ्यासक्रमाला प्रवेश केला. निक्कीनेही त्याच कॉलेजमध्ये BA (English hons) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यानंतर दोघेही ग्रेटर नोएडातील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. दोघांमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरु होतं. याच काळात दोघे मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, देहराडूनसह अनेक ठिकाणी फिरायलाही गेले.
‘प्रियकराला भाऊ सांगायची अन् मला…’, पतीची खळबळ उडवणारी सुसाईड नोट
ADVERTISEMENT
कोरोना लॉकडाऊन… साहिलने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यास दिला होकार
दरम्यान, नंतर कोरोनाचा शिरकाव झाला. देशात लॉकडाऊन लागला. त्यामुळे दोघेही आपापल्या घरी गेले. लॉकडाऊन संपल्यानंतर दोघेही परत दिल्लीत आले आणि लिव्ह इनमध्ये राहू लागले. आरोपी साहिलने निक्कीसोबतच्या रिलेशनशिपबद्दल घरच्यांना कुठलीही कल्पना दिली नाही. दुसरीकडे त्याच्या घरचे लग्नासाठी मागे लागले. याच काळात साहिलने लग्न करण्यास होकार दिला. डिसेंबर 2022 मध्ये साहिलचं लग्न ठरलं. साखरपुडा 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी लग्न असं ठरलं.
लग्नाची माहिती निक्कीपासून लपवली आणि गोव्याचा प्लान ठरला…
साहिलचं लग्न ठरल्याची माहिती निक्की यादवला नव्हती. दरम्यान, नंतर निक्कीला साहिलचं लग्न ठरल्याचं कळलं. त्यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. दोघांनी लग्नाआधीच गोव्याला पळून जाण्याचा प्लान केला. निक्कीने 9 फेब्रुवारीचे तिकीट बुक केले. दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा प्लानही केला. पण, साहिलने अखेरच्या क्षणी गोव्याला जाण्यास नकार दिला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निक्कीने साहिलला केस करण्याची धमकी दिली. 9 फेब्रुवारी रोजी साहिलचा साखरपुडा झाला. त्यानंतर निक्कीने त्याला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं.
Gangrape : बर्थडे पार्टीत मादक द्रव्य पाजलं आणि नंतर पाच जणांनी…
कारमध्ये भाडणं झालं अन्…
साहिलने निक्की यादवला त्याच्या कारमध्ये बसवलं. त्यानंतर दोघांचं कारमध्ये भांडणं झालं. दुसऱ्या मुलीशी लग्न करू नको, असा तगादा निक्कीने लावला. तसेच गोव्याला जाण्यासाठी ती साहिलची मनधरणी करत होती. पण, साहिल गोव्याला न जाण्यावर ठाम होता. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि साहिलने निक्कीच्या हत्येचा निर्णय घेतला.
मोबाईलच्या डेटा केबलने आवळला गळा…
26 वर्षीय आरोपी साहिलने कश्मीरी गेट आयएसबीटी जवळ 22 वर्षाच्या निक्की यादवची हत्या केली. साहिलने मोबाईलच्या डेटा केबलने निक्की यादवचा गळा आवळला. निक्कीची हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह त्याच्या मित्राऊ गावात नेला. तिथे त्याच्या बंद पडलेल्या ढाब्यावर गेला. ढाब्यातील फ्रीजमध्ये त्याने निक्कीचा मृतदेह ठेवून दिला.
बंद पडलेल्या ढाब्यातील फ्रीजमध्ये निक्कीचा मृतदेह ठेवून दिल्यानंतर साहिलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने लग्नही केलं.
Shraddha Walker : चेहरा जाळला, हाडांची पावडर केली; श्रद्धाच्या खुनाची भयावह कहाणी
निक्की यादवच्या हत्येचं बिंग कसं फुटलं?
साहिल गेहलोतने चार दिवस निक्की यादवचा मृतदेह फ्रीजमध्येच ठेवला होता. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पोलिसांना माहिती मिळाली की, एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्यावरील फ्रीजमध्ये ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी ढाब्यावर जाऊन झाडाझडती घेतली. त्यावेळी निक्कीचा मृतदेह आढळून आला.
दुसरीकडे निक्की यादव बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांत आली होती. पोलीस जेव्हा साहिलच्या घरी पोहोचले. तो घरी नव्हता. पोलिसांनी जेव्हा त्याचा फोन लावला, तो बंद होता. पोलिसांनी चक्र फिरवली आणि साहिल गेहलोतला खैर गावातून अटक केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूल देत सगळा घटनाक्रम सांगितला. त्याच्याविरुद्ध भादंवि 302, 201 कलमान्वये गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT