दीपक केसरकर, आम्ही कधी ठाकरेंचं ऐकलं नाही; तुम्ही औकातीत राहायला शिका -निलेश राणे
शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, यामुळे शिंदे गटातील आणि भाजपतील पारंपरिक राजकीय स्पर्धक असलेल्या नेत्यांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचं नाव घेत युती फिस्कटल्याबद्दल विधान केलं. त्यावरूनच आता माजी खासदार निलेश राणेंनी टीकास्त्र डागलं आहे. निलेश राणेंनी एका व्हिडीओतून दीपक केसरकर यांच्यावर सुशांतसिंग […]
ADVERTISEMENT
शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, यामुळे शिंदे गटातील आणि भाजपतील पारंपरिक राजकीय स्पर्धक असलेल्या नेत्यांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचं नाव घेत युती फिस्कटल्याबद्दल विधान केलं. त्यावरूनच आता माजी खासदार निलेश राणेंनी टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT
निलेश राणेंनी एका व्हिडीओतून दीपक केसरकर यांच्यावर सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण, आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांवरून निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना काय म्हटलंय?
“राणेंबरोबर काम करायला तयार आहोत, असं दीपक केसरकर कुठल्यातरी पत्रकार परिषदेत बोलले. ते काम करायला तयार आहेत, म्हणजे आम्ही काय थांबलो होतो का? दीपक केसरकर स्वतःला खूपच महत्त्व द्यायला लागले आहेत. एवढं महत्त्व त्यांचं कधीच नव्हतं. दीपक केसरकर यांनी स्वतःची लायकी काय आहे, हे ओळखून घ्यावं”, असं निलेश यांनी दीपक केसरकर यांना म्हटलं आहे.
हे वाचलं का?
“मला तरी वाटतंय की त्यांना कसलातरी मानसिक रोग झाला आहे. कधी ठाकरे कुटुंबाबद्दल चांगलं बोलतात. दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याबद्दल वाईट बोलतात. त्यांचा वरचा मजला सगळा रिकामा झालाय. मी बोलायचं टाळत होतो. सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये ते नारायण राणे यांचं नाव घेऊन काहीतरी बोलले. त्यांना आठवण करून द्यायचीये. या देशातील एक मोठं नाव आहे सुब्रमण्यम स्वामी. त्यांचं (सुब्रमण्यम स्वामी) या विषयाबद्दल काय मत आहे, हे त्यांनी जुने व्हिडीओ बघावेत. सर्वोच्च न्यायालयात आदित्य ठाकरेंचं ना कुणी घेतलं होतं. तिथे तर राणे नव्हते. हे रेकॉर्ड दीपक केसरकर यांनी बघावेत”, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.
ठाकरेंना ग्रीन सिग्नल मिळालाय का?, निलेश राणेंचा सवाल
“अर्णब गोस्वामी यांनी हे या प्रकरणाबद्दल काय काय बोलले हेही तपासून घ्यावं. काही घडलं असेल, तर त्यांनी बोललं पाहिजे. हत्या करा, बलात्कार करा, ड्रग्ज घ्या असा काय ठाकरेंना ग्रीन सिग्नल मिळालेला आहे का? तेव्हा आम्ही बोललो. तेव्हा सगळेच बोलले. अनेक प्रतिष्ठित लोक त्यावेळी बोलले. ते सगळे रेकॉर्ड काढून बघा म्हणजे कळेल.”
“तेव्हा दीपक केसरकर हे गोव्यामध्ये होते. त्यांना महाराष्ट्राचं काही माहिती नव्हतं. दीपक केसरकर, तुम्ही औकातीत राहायला शिका. तुमची औकात काय आहे, हे मागच्या वेळी काढली होती. परत त्याच्यात जाणार नाही. जर नख लावाल, तर तुम्हाला फाडून टाकेन, एवढं लक्षात ठेवा”, असा इशारा निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना दिला आहे.
ADVERTISEMENT
“आम्ही कधी ठाकरेंचं ऐकलं नाही, तुम्ही तर…”
“आमच्या भानगडीत जाऊ नका. कदाचित मुंबईत माहिती नसेल की, इकडे तुमची लायकी काय आहे. पण मतदारसंघात तुमची काय औकात आहे, हे तुम्हाला माहितीये. आम्हाला सर्वांना माहितीये. आमच्या भानगडीत तुम्ही जाऊच नका. कारण आम्ही कधी ठाकरेंचं ऐकलं नाही, तर तुम्ही आमच्या गिणतीतच नाहीत. तुम्हाला जर राणेंबरोबर एव्हढीच हौस आहे, तर १ तारखेपासून चालकाची नोकरी आहे, तुम्ही रूजू व्हा”, असा टोला निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT