निर्मला सीतारामन यांच्या मिशन बारामतीचा दौऱ्याचा नारळ भाजपच्या बालेकिल्ल्यातूनच फुटणार…
पुणे: भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यातही संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला व भोर या […]
ADVERTISEMENT
पुणे: भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यातही संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला व भोर या विधानसभा मतदारसंघांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
ADVERTISEMENT
निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा
22 सप्टेंबर रोजी खडकवासला व भोर, 23 सप्टेंबर रोजी पुरंदर आणि बारामती तर 24 रोजी दौंड आणि इंदापूर येथे निर्मला सीतारामन येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध धार्मिक स्थळांना भेटी, विकास कामांची पाहणी, केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा, तसेच भाजप कार्यकारणीच्या विविध सेलच्या बैठका आणि आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर 24 सप्टेंबरला पुणे येथे त्यांची पत्रकार परिषदेने दौऱ्याचा समारोप होणार आहे.
2019 च्या निवडणुकीत भाजपला खडकवासलातून लीड
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांना खडकवासला विधानसभा मतदार संघातून ८५ हजार मतांचं लीड होतं. भाजपचे आमदार भीमराव तापकीर हे दोनवेळा खडकवासला मतदार संघातून आमदार आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात खडकवासला मतदार संघातून केली असावी.
हे वाचलं का?
चंद्रशेखर बावनकुळेचाही दौरा होता चर्चेत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याअगोदर बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्याचा नारळ शरद पवारांच्या काटेवाडीतून फोडला होता. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने प्लॅनिंग केलं आहे. भाजपच्या मिशन २०२४ मध्ये राज्यातील १६ मतदार संघांमध्ये बारामतीचा समावेश आहे.
बारामती लोकसभेवरती शरद पवारांचं वर्चस्व
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं जन्मगाव म्हणजे काटेवाडी. बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. गेली अनेक वर्ष बारामतीवरती पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे दोन वेळा लोकसभेवरती निवडूण गेल्या आहेत. अजित पवार बारामतीमधून आमदार आहेत. त्यामुळे याच बारामतीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. शरद पवार ज्या मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात करतात त्याच मंदिरात नारळ फोडून चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT