काँग्रेसच्या नेत्यांना कुणीही मोजत नाही; वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानावर गडकरी संतापले
देवेंद्र फडणवीस यांची जिरवल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कानात सांगितलं होतं, असं खळबळजनक विधान राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त नितीन गडकरी यांनी वडेट्टीवारांना कडक शब्दात सुनावलं. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू असून, प्रचारात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांची जिरवल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कानात सांगितलं होतं, असं खळबळजनक विधान राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त नितीन गडकरी यांनी वडेट्टीवारांना कडक शब्दात सुनावलं.
देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू असून, प्रचारात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ३६ चा आकडा असल्याचा दावा केला. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं जमत नसल्याचं नागपूरकरांना माहिती आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांची जिरवल्याचं नितीन गडकरी यांनीच आपल्या कानात सांगितलं होतं, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी प्रचारसभेत बोलताना केलं.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नितीन गडकरी यांनी वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलं असून, वडेट्टीवारांना सुनावल आहे.
‘विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये’, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.