“नितीन गडकरींना आडवाणी होण्याची चिंता सतावत नाहीये ना”; गडकरींच्या विधानांची का होतेय चर्चा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाची चर्चा तर नेहमीच होत असते. जुने किस्से ऐकवत नितीन गडकरी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींकडून गेल्या जाणाऱ्या विधानांचा सद्य राजकीय स्थितीशी संबंध लावले जात असून, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. सोशल मीडियावर विविध मत-मतांतरे व्यक्त होताना दिसताहेत.

ADVERTISEMENT

नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरींची मुलाखत झाली. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. याच कार्यक्रमात नितीन गडकरींनी कुणाचा वापर करून त्याला बाजूला करणं चांगली गोष्ट नाही, असंही म्हटलं. त्याचबरोबर पराभवाने माणूस संपत नाही, जेव्हा तो लढायचं सोडतो तेव्हा माणूस संपतो, असंही गडकरी म्हटले.

नितीन गडकरी यांची भाषणातील विधानांचा संबंध सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात भाजपत सुरू असलेल्या घडामोडींशी लावला जाताना दिसतोय. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याच विधानांवर बोट ठेवत एक ट्विट केलंय. एका ओळीत केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांचाही उल्लेख केला आहे.

हे वाचलं का?

‘सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हाच प्रॉब्लेम’; नितीन गडकरींनी मोदी सरकारचे टोचले कान?

एक व्हिडीओ शेअर करताना अतुल लोंढेंनी म्हटलंय की, “नितीन गडकरींना आडवाणी होण्याचं दुःख तर सतावत नाहीये ना.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

नितीन गडकरींच्या विधानांचे वेगवेगळे अर्थ का लावले जात आहेत?

अलिकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून बाहेर करण्यात आलं. तर महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक समितीत घेण्यात आलं. भाजपकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर काही माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं की, नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानांमुळे हा निर्णय घेण्यात आला.

टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं होतं की, भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी हे संघाच्या जवळचे मानले जातात. याच रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं की, नितीन गडकरींना अशी विधानं टाळण्याची कल्पना देण्यात आली होती. त्यांची विधान विरोधकांना भाजपवर टीकेची संधी देतात असंही म्हटलेलं होतं.

संसदीय मंडळातून बाहेर करण्यात आल्यानंतर नितीन गडकरींनी वेगवेगळ्या कार्यक्रमात केलेल्या विधानांबद्दल आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात विरोधकांकडून भाष्य केलं जात आहे.

‘त्या’ ऑफरवर नितीन गडकरी म्हणाले, ‘विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही’

नितीन गडकरींची काही दिवसांतील चर्चेत राहिलेली विधानं

नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वी NATCON2022 या कार्यक्रमात बोलताना एक विधान केलं होतं. ज्याचा संबंध थेट मोदी सरकारच्या निर्णय प्रक्रियेशी लावला गेला. नितीन गडकरी म्हणाले होते, “बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे, पण सरकारची सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे सरकार वेळेवर निर्णय घेत नाही.”

जुलै २०२२ मध्ये नितीन गडकरींच्या एका विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले होते की, अनेक वेळा असं वाटतं की कधी राजकारण सोडावं आणि कधी नाही. राजकारण हे समाजकारणासाठी आहे, हे समजून घेतलं पाहिजे. पण, सध्या राजकारण हे १०० टक्के सत्ताकारणासाठी केलं जात आहे.

मार्च २०२२ मध्येही नितीन गडकरींच्या एका विधानाची बरीच चर्चा झाली होती. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. देशात लोकशाही सक्षम होण्यासाठी काँग्रेस सशक्त होणं गरजेचं आहे. काँग्रेस कुमकुवत झाल्यानं देशात काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत. गडकरींच्या या विधानाची काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कौतुक केलं होतं.

‘…तेव्हापासून नितीन गडकरी अस्वस्थच आहेत’; ‘ईडी’चा उल्लेख करत शिवसेनेनं काय सांगितलं?

भाजपच्या केंद्रातील सत्तेचं अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणींना श्रेय

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी भाजपच्या केंद्रातील सत्तेचं श्रेय लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांना दिलं होतं. “अटलजी म्हणाले होते की, अंधेरा छटेगा, सूजर निकलेगा, कमल खिलेगा. मी त्या कार्यक्रमात होतो. ते भाषण ऐकणाऱ्या प्रत्येकाला हा विश्वास होता की, तो दिवस येईल. अटलजी, आडवाणीजी, दीनदयाल उपाध्याय आणि अनेक कार्यकर्त्यांनी असं काम केलं की आज आपण (भाजप) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आणि अनेक राज्यात सत्तेत आहोत.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT