JD(U)MLAs : 2024 च्या तयारीला लागलेल्या नितीश कुमारांना भाजपने दिला आणखी एक झटका!
कमळाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलांसोबत (RJD) सत्ता स्थापन करणाऱ्या नितीश कुमारांना इतर राज्यात भाजपने सलग दुसरा झटका दिलाय. बिहारमधील सत्तांतरानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भाजपने बिहारमधील वचपा काढत दुसरा धक्का नितीश कुमारांच्या जदयूला दिला. बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमारांनी राजदसोबत […]
ADVERTISEMENT

कमळाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलांसोबत (RJD) सत्ता स्थापन करणाऱ्या नितीश कुमारांना इतर राज्यात भाजपने सलग दुसरा झटका दिलाय. बिहारमधील सत्तांतरानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भाजपने बिहारमधील वचपा काढत दुसरा धक्का नितीश कुमारांच्या जदयूला दिला.
बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमारांनी राजदसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता भाजपने नितीश कुमारांच्या जदयूला अरुणाचल प्रदेश पाठोपाठ मणिपूरमध्येही धक्का दिला.
नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाचे सहा पैकी पाच आमदार भाजपत दाखल झाले आहेत. रात्री उशिरा घडलेल्या या राजकीय भूंकपाचे हादरे मणिपूर बरोबरच बिहारमध्येही जाणवले. जदयूने यावर टीका करताना हे असंवैधानिक असल्याचं म्हटलंय, तर भाजपनं आमदारांचं स्वागत केलंय.
MLAs join BJP : जदयूला मणिपूरमध्ये झटका
मणिपूर विधानसभेचे सचिव मेघजीत सिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार जदयूच्या पाच आमदारांचा भाजपातील प्रवेश स्वीकृत करण्यात आला आहे. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार स्वीकारलं गेलं आहे.