Kirit Somaiya: सोमय्यांची ती जखम खरी की खोटी?, रुग्णालयाचा रिपोर्ट आला समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. यावेळी शिवसैनिकांकडून आपल्या हत्येचा प्रयत्न केला गेला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या हल्ल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीमधून रक्त येत असल्याचं काही फोटोंमधून दिसतं होतं. मात्र, सोमय्यांची ही जखम खोटी असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. दरम्यान, आता याचबाबत भाभा रुग्णालयाचा एक रिपोर्ट समोर आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.

ADVERTISEMENT

राणा दाम्पत्य हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी अटकेत होते, 23 एप्रिललाच खार येथील त्यांच्या राहत्या घरातून राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कारण राणा दाम्पत्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायची होती आणि त्यामुळे अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.

त्याचं झालं असं राणा दाम्पत्याला भेटल्यानंतर किरीट सोमय्या रात्री 10 च्या सुमारात पोलीस स्टेशनच्या बाहेर होते. त्याआधीपासूनच खार पोलीस स्टेशनच्या बाहेर अनेक शिवसैनिक जमले होते. त्यामुळे सोमय्या येताच अनेक शिवसैनिक आक्रमक झाले आणि आक्रोश करण्यास सुरुवात केली.

हे वाचलं का?

त्याचवेळी सोमय्यांची गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर आली आणि सोमय्यांच्या गाडीच्या काचेवर एक वस्तू फेकली गेली, किरीट सोमय्या ज्या बाजूला बसले होते, त्याच बाजूची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली, असं चित्र या व्हिडीओतून समोर येतं आहे. यावर सोमय्यांनी शिवसैनिकांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केला होता.

सोमय्यांनी असे गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत थेट असं म्हटलं की, ‘कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टॉमेटो सॉस लावून फिरत असेल आणि सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.’

ADVERTISEMENT

अशी मिश्किल प्रतिक्रिया देत राऊतांनी सोमय्यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

Sanjay Raut: ‘टॉमेटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावायला सांगतात’, राऊत सोमय्यांना म्हणाले वेडा

मात्र, आता सूत्रांच्या माध्यमातून एक अशी माहिती समोर आली आहे की, हल्ल्यानंतर पोलिसांकडून सोमय्यांची तपासणी करण्यात आली होती. आणि त्याच तपासणीचा अहवाल भाभा हॉस्पिटलकडून मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे. पाहा त्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे ते.

अहवालात काय म्हटलं आहे?

-सोमय्यांच्या चेहऱ्यावर 0.1 CM चा कट आहे

-चेहऱ्यावर कोणतीही सूज नाही

-कटमधून रक्तस्त्राव झाला नाही

-कोणतीही मोठी दुखापत झाली नाही

आता हा अहवाल, संजय राऊतांनी केलेलं विधान आणि ज्यांच्या चेहऱ्यावर जखम झालेय, त्या सोमय्यांनी केलेला आरोप या सगळ्यांचा विचार केल्यानंतर मुंबई पोलीस काय निष्कर्ष काढणार हे पाहणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT