जाधवांच्या मनसुब्यांना Congress चा ब्रेक, आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत – थोरातांचा टोला
विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन गाजवणारे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या मनसुब्यांना काँग्रेसने वेळेतच ब्रेक मारला आहे. भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन आणि दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर प्रतिविधानसभा उधळून लावण्याच मोलाची भूमिका भास्कर जाधव यांनी बजावली. यानंतर नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं विधानसभा अध्यक्षपद भास्कर जाधवांना द्यावं अशा चर्चांना सुरुवात झाली. खुद्द भास्कर जाधवांनीही याबद्दल इच्छा बोलून […]
ADVERTISEMENT
विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन गाजवणारे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या मनसुब्यांना काँग्रेसने वेळेतच ब्रेक मारला आहे. भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन आणि दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर प्रतिविधानसभा उधळून लावण्याच मोलाची भूमिका भास्कर जाधव यांनी बजावली. यानंतर नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं विधानसभा अध्यक्षपद भास्कर जाधवांना द्यावं अशा चर्चांना सुरुवात झाली. खुद्द भास्कर जाधवांनीही याबद्दल इच्छा बोलून दाखवली. परंतू काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी जाधवांच्या या गाडीला ब्रेक लावला आहे.
“विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी चांगली कामगिरी पार पाडली. पण हे पद शिवसेनेला देण्य़ाचा कोणताही विचार किंवा चर्चा झालेली नाही. आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत”, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा कायम असल्याचं सांगितलं.
विधानसभेत भाजप आमदारांना नडलेल्या भास्कर जाधवांना अध्यक्षपदावर संधी देण्यात यावी. यासाठी शिवसेनेकडे असलेलं वनमंत्रीपद हे काँग्रेसला देऊन त्या बदल्यात अध्यक्षपद आपल्याकडे घ्यावं अशी मागणी खुद्द भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती. परंतू जाधवांना अध्यक्षपद देण्यासंबंधी कोणताही विचार झालेला नाही, आमची तशी चर्चाही झालेली नाही अस नगर दौऱ्यावर असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
“आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. शिवाय सत्ता वाटपात विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आलेलं आहे. आता याच्यामध्ये बदल करण्यासंबंधी आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली नाही. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही… यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे… कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे”, असंही थोरात म्हणाले.
ADVERTISEMENT