Nagpur मध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा, भरदिवसा गोळीबार; तरुण गंभीर जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

नागपुरात (Nagpur) कायदा व सुव्यवस्थेचे (law and order) तीन तेरा वाजले असल्याने सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारी घटनांवरून समोर येत आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी भरदिवसा नागपुरात एका जुन्या वादातून काही युवकांनी एक तरुणावर गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दोन राउंड गोळ्या फायर केल्या आणि त्या मोहसीन नावाच्या युवकाला लागल्या.

या गोळीबारामुळे मोहसिन हा गंभीर जखमी झाला असून त्याला नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

नागपुरातील गीतांजली टॉकीज चौकात सकाळच्या सुमारास ही घटना घडलेली असून पोलीस आरोपींच्या शोधात असून लवकरच या गोळीबारामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

परंतु भर दिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नागपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर शहरांमध्ये सामूहिक बलात्कार, वादातून होणाऱ्या हत्या यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे नागपुरात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र अद्याप तरी पोलिसांच्या हाती या प्रकरणातील एकही गुन्हेगार लागलेला नाही. एकीकडे नागपूरसारख्या शहरात अशाप्रकारे गुन्हे घडू लागल्याने जनतेत भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

ADVERTISEMENT

नागपूर : भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटलं, घटना CCTV मध्ये कैद

नागपुरातील गोळीबाराच्या या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. अशाप्रकारे गुन्हेगार भर रस्त्यात एखाद्या व्यक्तीवर हल्ला चढवत असल्याने नागपुरात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल आता नागपूरकर विचारु लागले आहेत.

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. असं असताना उपराजधानीमध्येच जर असे प्रकार घडत असतील तर गृह विभागाच्या कारभाराबद्दल देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना नागपूरच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तसं झालं तरच नागपूर गुन्हेगारीमुक्त होऊ शकतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT