ना सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्कचा पत्ता नाही; संजय राठोडांकडून कोरोनाचे नियम पायदळी

मुंबई तक

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी रात्रीपासून निर्बंध लागू केले आहेत. ज्यात लग्न सोहळ्यांपासून ते इतर सामाजिक कार्यक्रमांत लोकांच्या उपस्थितीवर नियंत्रण घालून देण्यात आलं आहे. याचसोबत कार्यक्रमाचं आयोजन करताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्यास बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतू राज्य सरकारने हे नियम जाहीर केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या नियमांना खुद्द […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी रात्रीपासून निर्बंध लागू केले आहेत. ज्यात लग्न सोहळ्यांपासून ते इतर सामाजिक कार्यक्रमांत लोकांच्या उपस्थितीवर नियंत्रण घालून देण्यात आलं आहे. याचसोबत कार्यक्रमाचं आयोजन करताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्यास बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतू राज्य सरकारने हे नियम जाहीर केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या नियमांना खुद्द शिवसेना आमदारानेच पायदळी तुडवलं आहे.

माजी मंत्री आणि आमदार संजय राठोड यांनी दिग्रस येथे आयोजित विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मोठी गर्दी जमवून कोरोनासंबंधी शासनाचे नियम पायदळी तुडवले. संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, हास्यजत्रा फेम कलाकार समीर चौगुले, अरुण कदम यांनीही हजेरी लावली होती.

लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

सिने कलाकारांना पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होणार याचा अंदाज घेऊन भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली होती. परंतू आयोजकांनी गृहीत धरलं होतं त्याच्यापेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी जमा झाली. ज्यात महिलांपासून मुलांपर्यंत ते थेट वृद्धांचाही समावेश होता. ज्यात आसनव्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला पूर्णपणे हरताळ फासला होता. इतकच नव्हे तर गर्दीत हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक मास्क घालून आले होते.

प्राजक्ताचा डार्क फँटसी अंदाज पाहिलात का?

एकीकडे सरकार सामान्य नागरिकांनी नियम कडक करुन त्याची अंमलबजावणी करवून घेत असताना खुद्द आमदारांनी अशा पद्धतीने नियम पायदळी तुडवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याआधी संजय राठोड हे टिकटॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलो होते. ज्यानंतर त्यांना आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे संजय राठोड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp