काय आहे डिजिटल रेप? नोएडातल्या ८१ वर्षांच्या वृद्धावर नेमका आरोप काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

दिल्लीतल्या नोएडा भागात लैंगिक शोषणाचं एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. त्यानंतर चर्चेत आहे डिजिटल रेप. या प्रकरणी २०१३ च्या Criminal Law मध्ये सुधारणा ( amendment ) करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) मध्ये समावेश करण्यात आला आहे. याला निर्भया अधिनियम असंही म्हटलं जातं. आपण जाणून घेऊ काय आहे डिजिटल रेपचा अर्थ?

ADVERTISEMENT

डिजिटल रेपचा अर्थ काय?

हे वाचलं का?

नोएडा पोलिसांनी सांगितल्यानुसार डिजिटल रेपचा अर्थ हा नाही की एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं शोषण इंटरनेटच्या माध्यमातून केलं जावं. हा शब्द डिजिट आणि रेप या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. इंग्रजीत डिजिटचा अर्थ अंक असा असतो. इंग्रजी शब्दकोशात बोटं, अंगठा, पायाची बोटं या सगळ्यांनाही डिजिट असं म्हटलं जातं. माहिती तज्ज्ञांच्या मते डिजिटल रेपशी संबंधित घटनांमध्ये महिलांच्या प्रायव्हेट पार्टचं शोषण केलं जातं.

एखाद्या महिलेचा, मुलीचं पायाच्या किंवा हाताच्या बोटांनी शोषण केलं जाणं याला डिजिटल रेप असं संबोधलं जातं. २०१३ला डिजिटल रेप ही संज्ञा पुढे आली. गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा करून बलात्काराच्या व्याखेत डिजिटल रेप म्हणजेच हाताने किंवा पायाच्या बोटांनी केलेलं शोषण हा प्रकार आणला गेला.

ADVERTISEMENT

लैंगिक शोषण झाल्याच्या आरोपांनंतर टेनिसपटू पेंग शुआई रहस्यमयरित्या गायब, चीनमध्ये दहशतीचं वातावरण

ADVERTISEMENT

लैंगिक शोषण मग ते तोंडावाटे, योनी वाटे, गुदद्वारावाटे केलं गेलं तरीही ते शोषणच आहे. या सगळ्या गोष्टी बलात्कार याच गुन्ह्यात मोडतात. निर्भया कायद्याचा खंड बी हे सांगतो की फक्त जननेंद्रीयच नाही तर शरीराच्या कुठल्या भागात कोणतीही वस्तू किंवा इतर अवयव म्हणजे बोटांनी केलेलं शोषण किंवा एखादी अशी वस्तू जी लिंग नाही त्याने केलेलं शोषण हे देखील बलात्कार या गुन्ह्यातच मोडतं.

मैत्रिणीला घरी बोलावलं, शीतपेयातून बियर पाजत केला बलात्कार; आरोपी अटकेत

आयपीसी कलम ३७५ काय सांगतं?

कुठल्याही व्यक्तीला बलात्काराचा आरोपी कधी म्हणता येईल जर ती व्यक्ती एका महिलेच्या योनी, तोंड, गुदद्वार यामध्ये लिंगाचा प्रवेश करत असेल किंवा कुठल्या अन्य व्यक्तीसोबत तसं करायला सांगत असल्यास

महिलेच्या योनी, गुदद्वार यामध्ये कोणतीही वस्तू किंवा शरीराचा असा भाग जो लिंग नाही त्याने शोषण करतो किंवा त्या व्यक्तीला हे करण्यास भाग पाडतो त्याला बलात्काराचा आरोपी म्हटलं जाईल.

एका महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाचं तो शोषण करत असेल किंवा तिला तसं करण्याभाग पाडत असेल तर त्याला बलात्काराचा आरोपी म्हटलं जावं

एखाद्या महिलेच्या योनी, गुदद्वार या ठिकाणी एखादा माणूस जर तोंड लावत असेल किंवा त्या व्यक्तीला तसंच करायला सांगत असेल तर पुढच्या सात परिस्थितीमध्ये तो बलात्कार मानला जाईल असंही हे कलम सांगतं.

एक-तिच्या मर्जीच्या विरोधात

दुसरं तिच्या मर्जीशिवाय

तिसरं मृत्यूचा धाक दाखवून, बंदूक दाखवून मिळवलेली तिची सहमती,

चौथी बाब- तिच्या मर्जीने, जेव्हा पुरूषाला हे माहित आहे की तो तिचा पती नाही तरीही तिने सहमती दिली आहे कारण ती मानते की तो एक पुरूष आहे

पाचवा मुद्दा-स्त्री नशेत असताना किंवा एखाद्या अंमलाखाली असताना, मानसिक अस्वस्थ असताना तिची सहमती घेणं

सहावा मुद्दा- तिचं वय १८ पेक्षा कमी असताना तिची सहमती घेऊन किंवा न घेता

सातवा मुद्दा- जेव्हा ती सहमती देण्यास असमर्थ असेल तेव्हा

अशा सात मुद्द्यांमध्ये तो बलात्कारच मानला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

८० वर्षांच्या वृद्धाचं प्रकरण काय?

अशाच प्रकरणात नोएडा पोलिसांनी एका ८० वर्षांच्या वृद्धाला अटक केली आहे. तो मूळचा प्रयागराजचा राहणारा आहे. त्याने १७ वर्षांच्या एका मुलीला आमीष दाखवून तिच्यावर डिजिटल रेप केला. हा आरोपी चित्रकार आहे. मॉरिस रायडरला पोलिसांच्या सेक्टर ३९ ठाण्याने अटक केली आहे.

आरोपी चित्रकार मोरिस रायडर हा त्याच्या महिला मैत्रिणीसह नोएडाच्या सेक्शन ४६ मध्ये राहतो. त्याच्या घरात एक १७ वर्षांची मुलगीही राहात होती. ती घरातलं काम करत होती. गेल्या काही वर्षांपासून मोरिसने लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला आहे.

ही पीडित मुलगी जेव्हा १० वर्षांची होती तेव्हा ती आरोपी मोरीसच्या घरी आली होती. आरोपीच्या विरोधात पुरावा म्हणून या मुलीने काही व्हीडिओ आणि फोटो काढले होते. याच आधारावर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि मुलीची वैद्यकीय तपासणीही केली.

मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी मोरिस रायडर या चित्रकाराला अटक केली आहे. पोलिसांनी १५ मे रोजी आरोपी मोरिसविरोधात कलम ३७६, कलम ३२३ आणि कलम ५०६ अन्वये तसंच POCSO कायद्याअन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT