Money Laundering प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या कार्यालयात पोहचली आहे. तिथे तिची चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी करण्यात येते आहे. याआधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली होती. त्याच प्रकरणात आता नोरा फतेहीलाही हजर राहण्यासाठीचं समन्स ईडीने बजावलं होतं. त्यामुळे नोरा फतेही ईडी कार्यालयात पोहचली आहे. ईडी कार्यालयात विचारल्या जाणाऱ्या […]
ADVERTISEMENT

mumbaitak
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या कार्यालयात पोहचली आहे. तिथे तिची चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी करण्यात येते आहे. याआधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली होती. त्याच प्रकरणात आता नोरा फतेहीलाही हजर राहण्यासाठीचं समन्स ईडीने बजावलं होतं. त्यामुळे नोरा फतेही ईडी कार्यालयात पोहचली आहे. ईडी कार्यालयात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तिला द्यावी लागणार आहेत.
दिल्लीच्या तिहार कारागृहातून २०० कोटींची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी नोरा फतेहीची चौकशी करण्यात येते आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिस उद्या ईडी कार्यालयात येऊ शकते.