Devendra Fadnavis: मी फिक्स मॅच पाहात नाही! मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंना टोला
मी फिक्स मॅच पाहात नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मुलाखतीवरून टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. महाराष्ट्रात जे बंड उभं राहिलं त्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. तसंच भाजपने शिवसेना फोडली त्यांना शिवसेना […]
ADVERTISEMENT
मी फिक्स मॅच पाहात नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मुलाखतीवरून टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. महाराष्ट्रात जे बंड उभं राहिलं त्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. तसंच भाजपने शिवसेना फोडली त्यांना शिवसेना संपवायची आहे हा आरोप केला.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत नेमकं काय म्हटलंय?
या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता मी लाइव्ह मॅच पाहतो, फिक्स असलेली, मी खऱी मॅच पाहतो. फिक्स मॅचबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची? वेळ आली तर त्यावर बोलता येईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच या मुलाखतीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
आणखी काय म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी?
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. संभाजी महाराजांच्या समाधीच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. मात्र अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने आरोप करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. संभाजी महाराजांच्या समाधी बांधण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली नाही. मी त्याबाबत फाईलवर शेरा लिहिला आहे की संभाजी महाराजांच्या समाधीच्या कामाला स्थगिती देणं योग्य होणार नाही.
हे वाचलं का?
या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री तसंच माझ्यासमोर सादरीकरण करावं. जेणेकरून आणखी काही कामं करावयची असल्यास तसं सांगता येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
शिवसेनेला आम्ही सोबत घेतलं आहे असं आता भाजपचं म्हणणं आहे. मात्र त्यांच्यासोबत जे गेले आहेत ते लोक म्हणजे शिवसेना नाही. तोडफोड करून त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना संपवण्यामागे त्यांचा हेतू हाच दिसतो आहे की त्यांना हिंदुत्वात कुणीही भागीदार नको आहे. आत्ता जे काही केलंय ते अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर सगळ्या गोष्टी सन्माने झाल्या असत्या.
ADVERTISEMENT
भाजपला शिवसेना नुसती फोडायची नाही तर संपवायची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तसंच शिवसेनेने हिंदुत्वासाठी राजकारण केलं. हिंदुत्व मजबूत झालं पाहिजे हा त्यामागचा हेतू होता. मात्र हे जे काही करत आहेत ते राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करत आहेत. आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT