Old Pension Scheme : शिक्षक संपावर; विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ

मुंबई तक

Old Pension Scheme News : चंद्रपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्ण, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतं असल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूरमध्ये शिक्षकांच्या संपाविरोधात संपामुळे विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत. “जो पर्यंत शिक्षक शाळेत येत नहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहिलं असा इशारा या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Old Pension Scheme News :

चंद्रपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्ण, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतं असल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूरमध्ये शिक्षकांच्या संपाविरोधात संपामुळे विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत. “जो पर्यंत शिक्षक शाळेत येत नहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहिलं असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. (Old Pension Scheme : Students protest as teachers are on strike)

नेमकं काय घडलं?

चंद्रपुर जिल्यातील वरोरा तालुक्यातील आसाळा गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची मुलं शिक्षक पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षक संपावर आहेत, शाळेत शिकवायला येत नाहीत, आमच्या अभ्यासाचे नुकसान होतं, म्हणून विद्यार्थ्यांनी गावात चक्काजाम आंदोलन सुरु केलं असून, गावातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.

आसाळा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आसाळा गावातील वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी विद्यार्थी मुलांनी शिक्षकांच्या विरुद्ध घोषणा देत त्यांना शाळेत लवकर येण्याची विनंती केली आहे. गावातील पालक समितीचे अध्यक्ष आणि गावकरी मुलांच्या या आंदोलनात सहभागी असून शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होतं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp