Omicron update : ऑस्ट्रेलियात ओमिक्रॉनने घेतला पहिला बळी; सिडनीमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ब्रिटन आणि अमेरिकेपाठोपाठ आता ऑस्ट्रेलियातही ओमिक्रॉनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाल्याची ही ऑस्ट्रेलियातील पहिलीच घटना आहे. मृत्यू झालेली व्यक्ती पश्चिम सिडनीमधील असून, त्या व्यक्तीने कोरोना लस घेतलेली होती.

ADVERTISEMENT

ब्रिटनबरोबरच ऑस्ट्रेलियातही ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भयावह परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ऑस्ट्रेलियात रुग्णसंख्येचा स्फोट झाला असून, न्यू साऊथ वेल्समध्ये एकाच दिवसात 6 हजार 324 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पश्चिम सिडनीमधील 80 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता. या व्यक्तीचं संपूर्ण लसीकरण झालेलं होतं. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Covid 19: कोरोनाचा धडकी भरवणारा वेग, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सापडले 1600 नवे रुग्ण

हे वाचलं का?

फ्रान्समध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. फ्रान्समध्ये एका दिवसात 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील महिन्यांपासून रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून, यातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक आहेत. फ्रान्समधील सरकारमधील तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काही दिवसात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या एका आठवड्यात फ्रान्समध्ये 1,000 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

Omicron: …तर पुन्हा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो: आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

ADVERTISEMENT

मुलीला कोरोनाचा संसर्ग; इस्रायलचे पंतप्रधान क्वारंटाईनमध्ये

इस्रायलचे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांच्या मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मुलीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पंतप्रधान बेनेट यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे.

अमेरिकन एअरलाईन्सने 1300 उड्डाण केली रद्द

जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळू येत आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग वाढण्याचा धोका असून, अमेरिकन एअरलाईन्सने रविवारी तब्बल 1300 पेक्षा अधिक विमान रद्द केली. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT