Omraje Nimbalkar : याचं बाळानं त्याच्या बापाला अन् त्याला बाळं काय आहे ते दाखवून दिलयं…
उस्मानाबाद : बाळा, बाळा… पण याचं बाळानं त्याच्या बापाला अन् त्याला लोकशाहीच्या माध्यमातून बाळं काय आहे ते दाखवलं आहे, असं म्हणतं ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप खासदार राणा जगजितसिंह पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर बोलत होते. उस्मानाबादमधील निंबाळकर-पाटील घराण्यातील जुना वाद आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा उफाळून आला. […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद : बाळा, बाळा… पण याचं बाळानं त्याच्या बापाला अन् त्याला लोकशाहीच्या माध्यमातून बाळं काय आहे ते दाखवलं आहे, असं म्हणतं ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप खासदार राणा जगजितसिंह पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर बोलत होते.
उस्मानाबादमधील निंबाळकर-पाटील घराण्यातील जुना वाद आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा उफाळून आला. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातच एकमेकांना भिडले. दोघांमध्येही टोकाचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला. याच वादानंतर बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर संस्कार नाहीत, त्यांची लायकी नाही, असं म्हणतं निशाणा साधला.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
यावर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, आजची बैठक फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची होती. तरीही राणा पाटलांनी विनाकारण शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने “तुम्ही तुमचे तक्रारी अर्ज घेऊन या, आपण अशी अशी बैठक लावली आहे” असं आवाहन केलं. त्यामुळे बिचारे शेतकरी सगळा काम-धंदा सोडून जिल्हाधिकारी ऑफिसवर आले.
त्यावेळी जमा झालेल्या शेतकऱ्यांनी अशी चर्चा चालू केली की बैठक आहे मग खासदार कुठे आहेत? विरोधी पक्षाचा आमदार कुठे आहे? अशी चर्चा चालू झाल्यानंतर मी स्वतःहून इथं आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, की बैठक होती का? होती तर मग फक्त सत्ताधारी लोकांनाच बोलवलं का? विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना बोलावलं नाही असं आहे का? जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं की कुठल्याही लोकप्रतिनिधिला निमंत्रित केलेलं नव्हतं. ही फक्त बैठक अधिकाऱ्यांची आहे.