IPL संघाच्या बसची तोडफोड : मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएल संघातील खेळाडूंना मैदानात ने-आण करणाऱ्या बसची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १५ मार्चला मुंबईतील ताज हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या बसची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड आहे. या कार्यकर्त्यांना अटक करुन पोलिसांनी एक दिवस कोठडीत ठेवलं होतं. कोठडी संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर केलं असताना आज आर.एम.नेरलीकर यांनी सर्वांना जामीन मंजूर केला आहे.

मनसे कार्यकर्त्यांची बाजू कोर्टात आर्चित साखळकर या वकीलांनी मांडली. मनसे कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त शिक्षा ही दोन वर्षांची आहे. सर्व आरोपी हे पोलिसांच्या एक दिवस कस्टडीत होते आणि त्यांचे फोनही पोलिसांनी स्वतःकडे घेतले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कस्टडीत ठेवून काहीही साध्य होणार नसल्याचं वकीलांनी सांगितलं.

सरकारी वकीलांनी याला विरोध दर्शवला परंतू कोर्टाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सर्व मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला आहे. तसेच भविष्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही याचीही हमी कोर्टाने घेतली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्येक इनिंगमध्ये दोन DRS ते सुपर ओव्हर; IPL 2022 साठी नियमांमध्ये महत्वाचे बदल

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये थांबलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना मैदानात ने-आण करण्यासाठी असलेल्या बसची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. मनसे वाहतुक शाखेच्या कार्यकर्त्यांना या घटनेबद्दल कुलाबा पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक बस ऑपरेटरला हे कंत्राट न देता दिल्ली येथील एका कंत्राटदाराला हे कंत्राट मिळाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. ज्यात पोलिसांनी मनसे वाहतुक शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत गांधी, संतोष जाधव आणि अन्य तीन कार्यकर्त्यांना अटक केली होती. या कार्यकर्त्यांना कोर्टाने आता जामीन मंजूर केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT