गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात एकाचा मृत्यू, चेंगराचेंगरी की हुल्लडबाजी… नक्की काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगलीतल्या बेडग या ठिकाणी झालेल्या गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी झाली. तसंच शाळेची कौलंही फुटली. एवढंच नाही तर कार्यक्रमाच्या बाहेर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

काय घडली घटना?

मिरज तालुक्यातील बेडग या गावात गजराज कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोशल मीडियाद्वारे जिला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे ती गौतमी पाटील होती. तिचं लावणी नृत्य सुरू होतं. कार्यक्रम बेडग येथील शाळेच्या प्रांगणात सुरू होता. काही प्रेक्षक शाळेच्या कौलांवर बसूनही हा कार्यक्रम पाहात होती. अचानक कौलं खाली कोसळली. तसंच हुल्लडबाजी आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

दत्तात्रय विलास ओमासे यांचा मृत्यू

दत्तात्रय विलास ओमासे (वय-४४) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गर्दीत दत्तात्रय ओमासे यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. कार्यक्रम परिसराच्या बाहेर एक मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. दत्तात्रय विलास ओमासे असे मृताचं नाव आहे . मात्र ओमासे यांच्या मृत्यूबाबत मिरज ग्रामीण पोलिसात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेडग मध्ये ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हा कार्यक्रम भरवला होता. त्या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

हे वाचलं का?

आयोजकांनी काय सांगितलं आहे?

आयोजकांनी सांगितले आम्ही कार्यक्रम भरवला होता.. मात्र कार्यक्रमच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली आणि काही हुलडबाज तरुणांनी शाळेवरती चढले आणि काही शाळेची कौले या ठिकाणी फुटली गेली. मात्र गजराज मंडळाकडून या शाळेचे दुरुस्तीचे काम ताबडतोब सुरू केले आहे. तसेच कुठलाही शिक्षक या ठिकाणी नाचला गेला नसल्याचेही आयोजकांनी सांगितले जुना व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आयोजकांचं म्हणणं आहे. तसेच जो मृतदेह आढळला आहे तो या गर्दीतला नसून तो शाळेच्या बाहेरील काही अंतरावरती तो मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे त्या मृतदेहाचा या कार्यक्रमाची काही संबंध नसल्याचे या आयोजकांनी सांगितले.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील ही एक डान्सर आहे आणि तिला लावणी डान्सर म्हणून ओळखलं जातं. अनेक कार्यक्रमात गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं देखील जातं आणि त्यासाठी तिला मानधन देखील दिलं जातं. गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ Youtube, instagram, facebook वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गौतमीच्या व्हिडीओची चर्चा होते. मात्र, काही व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळं गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

ADVERTISEMENT

सोशल मीडियाने गौतमी पाटीला प्रसिद्धी मिळवून दिली. आपला डान्स आणि एक्प्रेशनने अनेक तरुणांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली ती तिच्या डान्स आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे. खरंतर सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने असे काही डान्स स्टेप्स केले आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. ज्यानंतर गौतमीने लोकांची माफी देखील मागीतली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT