बुलडाणा : योग्य भाव न मिळाल्याने २०० क्विंटल कांदा शेतकऱ्याने मोफत वाटला
– ज़का खान, बुलडाणा प्रतिनिधी राज्यातील बळीराजावर आलेलं संकट अद्याप त्याची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये. बुलडाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे सुमारे २०० क्विंटल कांदा लोकांना मोफत वाटून टाकला. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये राहणाऱ्या कैलास पिंपळे यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे. कैलास पिंपळे यांची शेगावमध्ये ३ एकर शेती आहे. ज्यात […]
ADVERTISEMENT
– ज़का खान, बुलडाणा प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राज्यातील बळीराजावर आलेलं संकट अद्याप त्याची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये. बुलडाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे सुमारे २०० क्विंटल कांदा लोकांना मोफत वाटून टाकला. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये राहणाऱ्या कैलास पिंपळे यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.
कैलास पिंपळे यांची शेगावमध्ये ३ एकर शेती आहे. ज्यात २ एकर जमिनीवर त्यांनी यंदा कांद्याचं पिक घेतलं होतं. यासाठी पिंपळे यांना जवळपास २ लाख रुपये खर्च आला. निसर्गाच्या कृपेमुळे कांद्याचं पीकही चांगलं आल्यामुळे पिंपळे आनंदात होते. परंतू नेहमीप्रमाणे कांद्याच्या भावाने सगळी गडबड केली. कांद्याचे भाव उतरल्यामुळे एकाही बाजार समितीत पिंपळे यांच्या कांद्याला योग्य भाव मिळेनासा झाला.
हे वाचलं का?
काही व्यापाऱ्यांनी पिंपळे यांचा कांदा घ्यायचा तर सोडा तर त्याकडे साध बघितलही नाही आणि थेट नकार दिला. आधीच पिकासाठी आलेला दोन लाखांचा खर्च आणि त्यात बाजार समितीत ये-जा करण्यासाठी होणारा खर्च पिंपळे यांना परवडत नव्हता. घरासमोर ठेवलेला कांदाही आता उन्हामुळे हळुहळु खराब व्हायला लागल्यानंतर पिंपळे यांनी आपला कांदा परिसरातील नागरिकांना मोफत वाटायचं ठरवलं.
सुरुवातीला स्थानिकांनी पिंपळे यांच्या आवाहानला फारसा प्रतिसाद दिला नाही. परंतू वारंवार विनंती केल्यानंतर मग स्थानिकांनी हा कांदा घेण्यासाठी झुंबड गेली. लोकं मिळेल त्या साधनाने हा कांदा आपल्या घरी घेऊन जात होते. काही दिवसांपूर्वी पिंपळे यांना कांदा शेतात जनावरांना खाण्यासाठी फेकून दिला होता. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी हा नेहमी पिचलेला असतो. बुलडाण्यातील शेतकरी पिंपळे यांच्यावर ओढवलेला हा प्रसंगही हेच सांगून जातो.
ADVERTISEMENT
गढूळ झालेल्या सामाजिक वातावरणातही धर्मभेदाची भिंत ओलांडून ‘ती’ ने वाचवला जीव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT